Thursday, January 30, 2020

६६ टक्के लोकांना रोजचा खर्च भागवणेही कठीण

देशाच्या सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर एक सर्वेक्षण चिंतेत टाकणारे आहे. सामान्य माणसावर महागाई आणि आर्थिक मंदीचा डबल मारा होत आहे. सुमारे ६६ टक्के लोकांनी घर खर्च चालवायलाही नाकी नऊ येत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की महागाई दिवसागणिक वाढतच निघाली आहे. त्याचा परिणाम घराच्या बजेटवर होत आहे.
आयएएनएस सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार, एकूण ६५.८ टक्के लोकांचे म्हणणे आहे की त्यांना रोजचा खर्च करणंही कठिण होत आहे. सर्वेक्षणानुसार, अर्थसंकल्पाच्या आधी केलेल्या या सर्वेक्षणात सध्याची लोकांची आर्थिक स्थिती, रोजच्या खचार्चा ताळमेळ बसवताना होणारी तारांबळ समोर आली आहे. पगार वाढत नाही, मात्र खाद्यपदार्थांपासून सर्व गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे.

Wednesday, January 29, 2020

जनगणनेसाठी शिक्षकांच्या मेमधील सुट्टय़ा रद्द

शिक्षकांमध्ये खळबळ
जणगणनेसाठी मोठय़ा संख्येने शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्टय़ा रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकार्‍यांनी शिक्षणाधिकार्‍यांना तशा नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे.

शिक्षकांच्या वरिष्ठवेतनश्रेणीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार

शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील
 सांगली,(प्रतिनिधी)-
प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील यांचा नुकताच  सत्कार केला.यावेळी शिक्षकांचे विविध प्रश्न मांडले. यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना सौ.पाटील यांनी शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न प्रलंबित आहे.  उपशिक्षक 186 पात्र शिक्षक 29, पात्र पदवीधर शिक्षक 7 , विषय शिक्षक पात्र 2 ,वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावेत, अशी  मागणी शिक्षण सभापती सौ. आशाताई पाटील यांचेकडे करण्यात आली.

शाळेच्या आवारात भरला भाजी बाजार

'भाजी घ्या भाजी'चा कलकलाट
जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर (ता.जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या नं. 2 शाळेच्या आवारात आज भाजीपाला बाजार भरला होता,पण हा बाजार भरवला होता चिमुकल्या मुलींनी. आणि ग्राहक होते पालक. आपलीच भाजी खपली जावी म्हणून मुली वेगवेगळ्या क्लृप्त्या करताना दिसत होत्या.  'भाजी घ्या भाजी' अशी आरोळी,ग्राहकांचा कलकलाट यामुळे शाळा परिसर भाजीमंडईमय झाला होता.

मनामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी परमात्म्याचा आधार घेण्याची गरज


सुदीक्षाजी महाराज
नाशिक,(प्रतिनिधी)-
 मनामध्ये उद्भवणाऱ्या विपरित भावनांना दूर करुन शांती स्थापित करण्यासाठी परमात्म्याचा आधार घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी केले. महाराष्ट्राच्या ५३व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित विशाल जन समुदायाला संबोधित करतांना त्या बोलत होत्या.

विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व श्रवणभक्ती असली पाहिजे- प्रा.डॉ. रघुनाथ केंगार

कडेगांव,(प्रतिनिधी)-
वाचनाने मानव ज्ञानवंत प्रज्ञावंत बनतो आणि आपणास इच्छित स्थळापर्यंत पोहोचता येते, म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी चांगली चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. जो विद्यार्थी चांगले चांगले ऐकतो तोच विद्यार्थी उत्तम प्रकारे बोलू शकतो म्हणून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि श्रवणभक्ती असली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ. रघुनाथ केंगार यांनी केले.

Tuesday, January 28, 2020

चाइल्ड पोर्नोग्राफीची 25 हजार प्रकरणे उघडकीस

चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेने यासंबंधीचा अहवाल भारताकडे सोपवला आहे. या अहवालानुसार, भारतात गेल्या पाच महिन्यांत २५ हजारांहून अधिक चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ विविध सोशल मीडिया साइट्सवर अपलोड करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिड्रेन (एनसीएमइसी) कडून भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोकडे हा डेटा देण्यात आला आहे. अशा प्रकारची माहिती देता यावी, यासाठी गेल्या वर्षी सांमज्यस्य करार करण्यात आला होता.

Sunday, January 26, 2020

बलशाली भारतासाठी सुसंस्कारक्षम पिढी घडवा-डॉ रमेश होसकोटी

निष्ठा प्रशिक्षण केंद्रास भेट;निष्ठापूर्वक प्रशिक्षण घेण्याचे  केले आवाहन
जत,(प्रतिनिधी)-
शिक्षण हे सर्व व्यवसायाची जननी असून शिक्षकांनी नवनवीन ज्ञान,तंत्रे व कौशल्याचा वापर  नेहमी विधायक कार्यासाठी करावे. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतीमूल्ये, सकारात्मक जीवनदृष्टी घडवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे.सहज व कृतीयुक्त अध्यापन पद्धतीतून आनंददायी शिक्षणाबरोबरच अध्ययन निष्पत्तीवर भर देणे आवश्यक आहे.

Friday, January 24, 2020

भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्व विकास विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

कडेगांव,(प्रतिनिधी)-
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत "भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्व विकास" याविषयावर मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली असल्याची माहिती अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा. बापूराव पवार यांनी दिली.

उत्तम आरोग्यासाठी सकस आहाराची गरज : श्रीमंत ठोंबरे

जत,(प्रतिनिधी)-
अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपले आरोग्य उत्तम असेल तरच आपण पाहिजे त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. आपण सकस व उत्तम आहार घेतला तरच आपली प्रकृती चांगली राहते. तरच आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करून जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन प्रा. श्रीमंत ठोंबरे यांनी केले.
 बिळुर ( ता.जत) येथील  एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

परवीन बाबीच्या आयुष्याची शोकांतिका

परवीन बाबी हे नाव समोर उच्चारले की आपल्यासमोर येतो तिचा ग्लॅमरस अंदाज. बॉलिवूडची दिवा असं तिला म्हटलं जायचं. तिचं 'जवानी जानेमन हे गाणं' असो किंवा 'प्यार करनेवाले प्यार करते हैं शान से' हे गाणं असो किंवा अगदी खुद्दार सिनेमातलं 'मच गया शोर सारी नगरी रे' असो आजही तिची गाणी लोकांच्या लक्षात आहेत. मनावर रुंजी घालत आहेत. मात्र या परवीन बाबीचा मृत्यू झाला ते तीन दिवसांनी समजलं होतं. तिला जाऊन १५ वर्षे झाली आहेत. मात्र तिच्या अनेक चित्रपटांमुळे आणि एकाहून एक सरस गाण्यांमुळे ती आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे आणि यापुढेही राहिल.

...आणि लग्नात नीतू आणि ऋषी पडले बेशुद्ध

बॉलिवूडमधील 'ऑल टाईम हीट' जोडी म्हणजे अभिनेता ऋषी कपूर आणि नितू कपूर. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्या सेटवर ओळख झालेल्या या जोडीच्या लग्नाला आता जवळपास ४0 वर्ष झाली आहे. मात्र त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम, आदर यत्किंचितही कमी झालेला नाही. 'जहरीला इन्सान' या चित्रपटाच्याच वेळी या दोघांमधलं प्रेम खुललं आणि १९८0 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतु ऐन लग्नात नितू आणि ऋषी कपूर बेशुद्ध पडले होते. या मागचं कारण नितू कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

वसंत पंचमीचे महत्त्व

वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. भारतात साधारणत: मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्‍या संस्थांमध्ये, विद्येची देवता-सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो.

Thursday, January 23, 2020

फेसबुकवर फॉलोअर्स वाढले,नी पतीने पत्नीला ठार मारले

संशय माणसाचा घात करतो. संशय माणसाला स्वस्थ जगू देत नाही. संशयाने एकदा का डोक्यात घर केले की आयुष्य उदवस्त केल्याशिवाय राहात नाही. हाच संशय प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या नाशला कारणीभूत ठरला आहे. बायकोचे फेसबूकवरील फॉलोअर्स वाढल्याने नवऱ्याचे पित्त खवळले आणि तिला कट रचून यमसदनास पाठवले. पत्नीचा खून करून हा गेला तुरुंगात आणि तीन महिन्याची त्याची मुलगी मात्र अनाथ झाली. जयपूरमधील आमेर भागातील ही धक्कादायक घटना आहे.

संगणक साक्षर न झाल्यास पोलिसांची पदोन्नती रोखणार

संगणकाचा वापर आजच्या काळात खूपच आवश्यक झाला आहे. सर्वच क्षेत्रात संगणकाद्वारेच कार्यालयीन कामकाज केले जात आहे. शहरी भागात संगणकाने कामकाज होतेच पण, ग्रामीण भागातही आज संगणक महत्त्वाचे झाले आहे. सर्वच शासकीय कार्यालयात संगणक अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच कर्मचार्‍यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक झाले आहे. पोलिस विभगातही संगणाचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. तसे पोलिस कर्मचार्‍यांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

आचार्य चाणक्य देतात सुखी जीवनाचा मंत्र

आचार्य चाणक्य एक महान नीतिकार होते. त्यांनी सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी विविध नीती सांगितल्या आहेत. आजच्या काळातही या नीतींचे पालन केल्यास व्यक्ती अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्याच्या या दोह्यामधून समजू शकते की, व्यक्तीने कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहावे आणि कोणत्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहू नये.

रवि सांगोलकर यांना समाज गौरव पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री भैरवनाथ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिले जाणारे गौरव पुरस्कार संस्थेने जाहीर  केले असून यावर्षीचा पुरस्कार अंनिसचे युवा कार्यकर्ते रवि सांगोलकर यांना जाहीर झाला आहे.

Wednesday, January 22, 2020

भारतातील 231 शहरे सर्वात प्रदूषित

भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.

कसे फेडायचे कर्ज?


गृहकर्ज, वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्ड या सगळ्यांचे हप्ते एकाच वेळी चुकविण्याची वेळ अनेकांवर येते. अशा वेळी आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडतं. खर्चाचा ताळमेळ बसवता बसवता नाकी नऊ येतात. हप्ते वेळेत न भरल्यास सबल स्कोअरही खराब होतो. अशा परिस्थितीत अर्थनियोजन कसे करावे, यासाठीच्या काही टिप्स..
कर्जफेडीचे नियोजन कसे असावे हे तपासण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. मासिक उत्पन्न ७५,000 रुपये असलेल्या व्यक्तीचा मासिक खर्च ४0 हजार रुपये आहे. उर्वरित ३५ हजार रुपयांमध्ये या व्यक्तीला गृहकर्ज, वाहनकर्ज आणि क्रेडिट कार्डचे हप्ते भरावे लागतात. या व्यक्तीकडे २७ लाख ९३ हजार रुपयांची संपत्ती आहे. 

या आहेत भारतातील प्रभावशाली महिला

भारतीय महिला या जगभरात नेहमीच त्यांचे शांत, संयमी वागणे, लांब केस, साडी, दागिने, घरात आपल्या कुटुंबाची काळजी वाहणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. परंतु प्रत्येक पिढी दरपिढी काही महिला नेहमीची परंपरा मोडीत काढून स्वत:ला सशक्त, स्वतंत्र आणि विविध रुपात वावरताना दिसतात. झाशीची राणी लक्ष्मीबाईने रणात लढताना आपले प्राण अर्पण केले. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मानवतेचे प्रतीक मदर तेरेसा ही त्यातलीच काही उदाहरणे आहेत. अशाच काही प्रभावशाली महिलांची ही ओळख.. 

रुसलेल्या प्रेयसीची समजूत कशी काढाल?


प्रेमात मन फुलपाखरू होतं..जीवलगाच्या सभोवताल सारखं उंडाळत राहतं..चुकूनही जोडीदाराचे मन दुखू नये म्हणून फुलासारखा त्याला जपत राहतं..पण, एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याही नकळत आपला एखादा शब्द आपल्या आवडत्या व्यक्तीच्या थेट काळजाला भिडतो आणि मग सुरू होतो जीवघेणा अबोला. हा अबोला जसाजसा लांबत जातो तशीतशी जीवाची घालमेलही वाढत जाते. प्रेमातला गोडवा अनुभवायचा असेल तर हा अबोला लवकर संपायला हवा. काय विचारताय..कसा संपवायचा? वाचा मग खाली..

Tuesday, January 21, 2020

कॉलगर्लला बोलावले, आली पत्नी!

उत्तराखंडमधील काशीपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने व्हॉट्सअँप नंबरवर फोन करून बोलावलेली कॉलगर्ल ही त्याची पत्नीच निघाली. आपली पत्नीच कॉलगर्ल म्हणून आल्याचे पाहून या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर हे प्रकरण पोलिस स्थानकात गेले. पती पत्नीने एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

यंदा मोठ्या प्रमाणावर वाढणार बेरोजगारी

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच आयएलओने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल नोकरदार वर्गास यंदाचे वर्ष हे अत्यंत निराशाजनक ठरु शकणार असल्याचा दावा करतो आहे. अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी (२0२0) बेरोजगारीचा आकडा तब्बल २.५ अब्जपर्यंत वाढू शकतो. 'वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँण्ड सोशल आउटलूक: ट्रेण्ड्स २0२0' अर्थातच (डब्ल्यूईएसओ) नुसार जगभरात आर्धा अब्ज लोक जितके काम करत आहेत त्याच्याही पेक्षा कमी वेतनावर अधिक लोक अधिक तास काम करत आहेत,

वर्षभरात ८ हजार तणावग्रस्त व्यावसायिकांनी केल्या आत्महत्या

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
व्यावसायातील धोके आणि कर्जबारीपणामुळे तणावग्रस्त होऊन आत्महत्या करणार्‍या व्यावसायिकांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. त्यानुसार, सन २0१८ मध्ये देशातील सुमारे ८000 व्यावसायिकांनी आपले जीवन संपवले आहे.

Monday, January 20, 2020

अबब! एक टक्का लोकांकडे 70 टक्के संपत्ती


देशातील एक टक्का श्रीमंताच्या हातात देशाच्या ७0 टक्के लोकसंख्येच्या चौपट संपत्ती आहे. सर्व भारतीय अब्जोपतींची संपत्ती देशाच्या अर्थसंकल्पापेक्षा अधिक आहे, अशी माहिती ऑक्सफॅमच्या अहवालातून उघड झाली आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) वार्षीक सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सफॅमने टाइम टू केअर हा अहवाल प्रकाशित केला. त्यात जगातील २ हजार १५३ अब्जोपतींकडे पृथ्वीवरील ६0 टक्के लोकांपेक्षा अधिक संपत्ती आहे.

Sunday, January 19, 2020

सातवीच्या मुलीवर दोन शिक्षकांचा लैंगिक अत्याचार

नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेला दोन महिने उलटले असून पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शंकरनगर येथील एका नामांकित शाळेत मुलगी इयत्ता ७वीमध्ये शिकते. दोन महिन्यांपूर्वी आरोपी शिक्षक रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे यांनी मुलीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेले. मोबाईलमध्ये अश्लील  व्हिडिओ दाखवून तिच्यावर दोघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले.

Friday, January 17, 2020

संस्कृतचे गाढे अभ्यासक:डॉ. आ. ह. साळुंखे


ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांना सामुदायिक विकास व संसाधन व्यवस्थापन संस्था यांच्या वतीने दिले जाणारा पाचवा अश्‍वघोष पुरस्कार जाहीर झाला. सातारा येथे येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार्‍या धम्म महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानशा गावी एका शेतकर्‍याच्या कुटुंबात १४ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला. संस्कृत विषयात पहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली.

शब्दांचा जादूगार:जावेद अख्तर

हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या सुवर्णमय इतिहासामध्ये निर्माते, दिग्दर्शकांपासून ते अगदी कलाकार, संगीतकारांच्या जोड्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक कलाकाराचे योगदान तसे फारच महत्त्वाचे आहे यात शंकाच नाही. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर.

Wednesday, January 15, 2020

शिक्षण सेवकांना 25 हजार मानधन द्या: शिक्षक समिती

सांगली,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांचेसह  पदाधिकाऱ्यांनी ग्राम विकास मंत्री  हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री सौ. वर्षाताई गायकवाड, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांची शिक्षक, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्र्नांच्या सोडवणुकीसाठी मुंबईत भेट घेतली. यावेळी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षणासंबंधी चर्चा करण्यात आली आणि प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक सहमती दर्शविण्यात आली आहे.

Tuesday, January 14, 2020

(माहित आहे का?) अक्षय करतोय विशी-तिशीतल्या अभिनेत्रींशी रोमांस


बॉलिवूडमध्ये स्टार अभिनेते वय झालं तरी नायक म्हणून काम करत आहेत. त्यांचा हा रोमांस अगदी 23 ते 27 वय वर्षे असलेल्या अभिनेत्रींशी चाललेला असतो. आज शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, अमिर खान या कलाकारांनी पन्नाशी ओलांडली आहे,पण ते आजही विशी-तिशीतल्या अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमांस करताना पाहायला मिळतात. यापूर्वीही वयाचे अंतर असलेल्या जोडींचे चित्रपट आले. प्रेक्षकांनी किंवा चाहत्यांनी काहींना स्वीकारले काहींना नाही. पण हा ट्रेंड चालतच आला आहे. आज अक्षयकुमार 52 वर्षांचा आहे. पण अजूनही फिट आहे. त्यामेळे तोही विशी-तिशीतल्या अभिनेत्रींसोबत रोमांस करताना पाहायला मिळणार आहे. सुपर 30 आणि बाटला हाऊस फेम मृणाल ठाकूर ही बेलबॉटममध्ये अक्षयकुमारसोबत दिसणार आहे. मृणालचं वय 27 आहे. अक्षय आणि मृणालच्या वयात तब्बल निम्मं अंतर आहे. अक्षय आणखीही अशाच वयाच्या अभिनेत्रींसोबत आपल्याला दिसणार आहे

अभिनेत्रीसुद्धा स्वत:च्या हिंमतीवर 500 कोटी कमावतील


परवा अभिनेत्री विद्या बालनची मुलाखत वाचायला मिळाली. ती सतत महिला सशक्तीकरणविषयी बोलत असते. या मुलाखतीतही तिचा विषय हाच होता. अलिकडेच ती आपल्याला मिशन मंगलमध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत अक्षयकुमार, तापसी पन्नू,नित्या मेनन, कीर्ती कुल्हारी आणि सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. ती म्हणाली की, आता फिमेल स्टार्स पहिल्यापेक्षा अधिक ताकदवान होत आहेत. येणार्या दिवसांत महिला स्टार्स आपल्या ताकदीवर 200 आणि 500  कोटीचे चित्रपट देऊ शकतील. लोकांच्या रुची बदलताहेत. काही महिला प्रधान चित्रपट रिलिज होत आहेत. आणि ते हिटही होत आहेत. अजूनही काही मोठे चित्रपट येत आहेत. हे चित्रपट नवे रिकॉर्ड रचतील, असा तिला विश्वास आहे.

इरफान खान दुसरी इनिंग खेळायला तयार


बॉलीवूडमध्ये आपल्या कसदार अभिनयाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या इरफान खानने हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या तीन दशकाच्या फिल्मी करिअरमध्ये त्याने आतापर्यंत 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा जन्म 7 जानेवारी 1966 मध्ये जयपूरमध्ये झाला. अलिकडे तो कॅन्सरने ग्रस्त होता. इरफानचं स्वप्न होतं क्रिकेटपटू बनायचंं. पण झाला अभिनेता. त्याच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू असताना त्याला आजाराने ग्रासले. आता तो आपल्या करिअरची दुसरी इनिंग खेळायला सज्ज झाला आहे. इरफानने 1988 मध्ये आलेल्या सलाम बॉम्बे चित्रपटाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण त्याची ओळख 2005 मध्ये आलेल्या रोग चित्रपटाने झाली. यानंतर हासिल, लंचबॉक्स, गुंडे, हैदर, पीकू पान सिंह तोमर, करिब करीब सिंगल, मदारी यशस्वी चित्रपट आले. त्याने ज्युरासिक पार्क आणि स्पायडरमॅन या हॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.

भूमिकेसाठी अभिनेत्री करतात शरीरासोबत एक्सपेरिमेंट


बॉलिवूड कलाकार चित्रपटातल्या आपल्या भूमिकेत स्वत:ला झोकून देण्यासाठी काहीही करायला तयार असतात. अमिरखान याबाबतीत आघाडीवर आहे. पण यात महिला कलाकारही काही मागे नाहीत. यांनीही भूमिकेनुसार स्वत:मधे बदल केला आहे. या अभिनेत्री वजन वाढवतात आणि घटवतातही. यासाठी त्यांना आपल्या डायटमध्ये बदल करावा लागतो. काही अभिनेत्रींनी अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंट केल्या आहेत. आता या यादीत कृति मेननचंही नाव सामिल झालं आहे. तिला आगामी मिमि चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवायचं आहे. हा चित्रपट सरोगेसीवर आधारित आहे. स्लिम बॉडीसाठी ओळखल्या जाणार्या या अभिनेत्रीला वजन वाढवण्याबरोबरच स्वत:लाही अभिनेत्री म्हणून सिद्ध करावं लागणार आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरासोबत एक्सपेरिमेंट करणार्या काही महिला कलाकारांमध्ये विद्या बालन आहे. कटरिना कैफ आहे. इतकंच काय प्रियंका चोप्रा, भूमि पेडणेकर, ऐश्वर्या रॉय, कंगना राणावत यांनाही भूमिकेसाठी स्वत:मध्ये बदल करावा लागला आहे.

Monday, January 13, 2020

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी(जत) शाळेचे घवघवीत यश

जत,(प्रतिनिधी)-
  गुड्डापूर  केंद्राच्या केंद्रास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत आसंगी (जत)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवले. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
गुडडापूर येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेचे नियोजन उत्कृष्टपणे  करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण यांच्या हस्ते झाले.त्यावेळी गुड्डापूर केंद्राचे पूर्वीचे केंद्रप्रमुख रतन जगताप यांचा उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून  सत्कार केंद्रातर्फे करण्यात आला.

आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्या;विलासराव जगताप

जत,(प्रतिनिधी)-
मराठा समाजाने कर्मकांड, पूजा पाठ, व्रत वैकल्ये, बुवाबाजी आदींच्या मागे न लागता आपल्या मुलांना चांगले शिक्षण व  संस्कार द्यावे, असे आवाहन जतचे माजी आम. विलासराव जगताप यांनी जत येथे केले. येथील अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे वतीने साईप्रकाश मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या  राजमाता जिजाऊ यांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतचे श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे  होते. 

Sunday, January 12, 2020

भारतात दरवर्षी पाच लाख अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू


देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. या अपघातात दीड लाख लोक मरण पावतात आणि सुमारे तीन लाख लोक जखमी आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. मंत्रालयाने अनेक उपाय योजना योजूनही मृतांच्या संख्येत काहीही कमी झाली नाही, असेही त्यांनी सांगतले. नवीन मोटर वाहन कायदा लागू करुन सरकारने जनजागृती करण्याचा आणि नियमांचे पालन करण्यास भाग पडण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट


स्थानिक भागातील सीताफळाचे मिळणारे उत्पादन, उत्पन्नापेक्षा अधिक उत्पादन तसेच उत्पन्न देणार्‍या सीताफळाच्या एनएमके -१ गोल्डन सीताफळाच्या या नव्या जातीला केंद्र सरकारने पेटंट जाहीर केले आहे. यामुळे टिकाऊ, निर्यात योग्य सीताफळामुळे शेतकर्‍यांचा फायदा होत असल्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील शेती संशोधक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळाच्या शोधून काढलेल्या या एनएमके-१ गोल्डन या जातीची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. सरकारकडून त्याची नोंदणी करण्यात आली आहे.

(माहित आहे का?) ऋत्विक लहानपणी बोलताना अडखळायचा


बॉलीवूड अभिनेता ऋत्विक रोशन याने केवळ प्रणयरम्य भूमिकाच नव्हे तर आपल्या माचोमॅन छबीनेही प्रेक्षकांना दिवाने बनवले आहे. 10 जानेवारी 1974 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या ऋत्विकला अभिनय कला वारसाने मिळाली आहे. त्याचे वडिल राकेश रोशन प्रसिद्ध फिल्मकार आणि अभिनेता आहेत. त्यांच्या आजोबांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ऋत्विकने बालकलाकार म्हणून आशा, आप के दिवाने, आसपास आणि भगवान दादा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिरोच्या भूमिकेत त्याने पहिल्यांदा 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या कहो ना प्यार है मध्ये काम केले. वडिल राकेश रोशन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला.

(माहित आहे का?) चित्रपटांसाठी अमरीश पुरीने सोडली सरकारी नोकरी


आपल्या जानदार अॅक्टिंग, दमदार आवाज आणि कुशल कार्यशैलीच्या जीवावर अमरीशपुरीने हिरो आणि व्हिलेन या दोन्ही क्षेत्रात जबरदस्त काम केले. त्यांचा जन्म 22 जून 1932 मध्ये पंजाबच्या नवांशहरमध्ये झाला होता. रंगमंचावरून चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आलेल्या अमरीशने काही स्मरणात राहणार्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. जवळपास चार दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करून आपली खास ओळख निर्माण केली.12 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अमरीश पुरी लेबर मिनिस्ट्रीमध्ये काम करत होते. त्यांनी आपला फिल्मी सफर करण्याच्या सुरुवातीला स्क्रिन टेस्ट दिली होती. आणि त्यात ते चक्क फेल झाले होते. पण ते थिएटरशी जोडून राहिले. अमरीश या दरम्यान नोकरी सोडणार होते. पण सत्यदेव दुबे यांनी त्यांना सल्ला दिला होता की, चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका मिळत नाहीत, तोपर्यंत नोकरी सोडायची नाही. शेवटी दिग्दर्शक सुखदेव यांनी त्यांना नाटकादरम्यान पाहिले आणि त्यांना आपल्या रेशमा आणि शेरा या चित्रपटासाठी साइन केले. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरसाठी शेवटी नोकरी सोडली.

Saturday, January 11, 2020

महाराजा दत्ताजीराव शिंदे स्मृतिदिनी उलगडला शिंदेशाहीचा इतिहास

राज्यस्तरीय शिंदेशाही स्नेहमेळावा वाळेखिंडीत संपन्न
जत,(प्रतिनिधी)-
श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने रणझुंजार महाराजा दत्ताजीराव शिंदे यांचा स्मृतिदिन व शिंदे शाही घराण्याचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा, वाळेखिंडी, ता.जत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यास राज्यभरातील हजारो शिंदे बांधवांनी हजेरी लावली.
दिल्लीच्या तख्तावर 15 वर्षे भगवा फडकविणारे महाराजा महादजी शिंदे व महाराजा दत्ताजीराव शिंदे यांचा गौरव व्हावा यासाठी शिंदे सरकार घराण्यातील बांधवांचा स्नेहमेळावा वाळेखिंडी येथील सिध्दनाथ हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला.

२४ तासांत २८ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

विद्यार्थ्यांवर सातत्याने वाढणारा दबाब आणि त्यातून येणार्‍या तणावामुळे विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील १0 वर्षात भारतात ८२ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. देशात २0१८ या वर्षात दर दिवशी २८ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालात उघड झाले आहे. एक जानेवारी २00९ ते ३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत आतापयर्ंत ८१ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

रयतेचे स्वराज्य निर्मिका : राजमाता जिजाऊ

जगामध्ये दोन छत्रपती तयार करणार्‍या राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला झाला. जिजाऊंच्या माहेरच्या लोकांचे नाव काय? सासरच्या लोकांचे नाव काय? यापेक्षा महत्त्वाचे आहे राजमाता जिजाऊ यांनी काय कार्य केले. जिजाऊंची ख्याती जगभर कशी पसरली. मुळात जाधव घराने कणखर बाणी व विज्ञानवादी होते. म्हणून जाधव घराण्यात १२ जानेवारीला जिजाऊंचा जन्म झाला आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिजाऊंचा जन्मदिवस हा सन उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. थोडक्यात जिजाऊंच्या जन्मानेच रयतेसोबतच ही जमीन सुद्धा धन्य झाली.

रोज सकाळी पाच गोष्टी करा,फिट राहा

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात करतो. कोणी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असतो तर कोणी जिमला जातो. मात्र अशी काही कामे आहेत जी प्रत्येक व्यक्तीने सकाळी करायला हवीत. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण केल्या तर आपले आयुष्य बदलून जाईल. जाणून घेऊया ती ५ कामे जी प्रत्येक व्यक्तीला करायला हवीत.

आक्कळवाडी जि. प.शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आक्कळवाडी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेने केंद्रास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. कबड्डी मोठा गट मुले आणि खोखो मोठा मुली या संघांनी विजेतेपद पटकावले आहे. गिरगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा 2019-2020 नुकत्याच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या. यात जि.प.कन्नड शाळा आक्कळवाडीच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात  मोठे यश मिळवले. जि.प. शाळा मोरबगी येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत  खालील क्रीडा प्रकारात सुयश मिळवले आहे.

Friday, January 10, 2020

संक्रांतीचे वाण

मकर संक्रांतीच्या दिवशी धनुर्मास (धुंधुरमास) संपतो. म्हणजे त्या दिवसापर्यंत तांदूळ आणि मुगडाळ यांच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून सकाळी लवकर जेवण करण्याचा प्रघात आहे. संक्रांतीच्या दिवसात तीळ व गूळ यांना फार महत्त्व आहे कारण या काळात थंडी असते. त्यामुळे गूळ व तीळ यासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन या काळात आरोग्यवर्धकच आहे.

मकर संक्रांतीचे महत्त्व

मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. भारतातील जवळजवळ सर्वच भागात मकर संक्रांतीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. इंडो-आर्यन (हिंदी) भाषेनुसार यांस 'मकर संक्रांथी' असे म्हटले जाते. दक्षिणेकडील काही भागात आजही हेच नाव प्रचलित आहे. हा सण विशेषत: सूर्य देवतेशी संबंधित आहे. सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत होणारे संक्रमण यांस 'संक्रांती' असे म्हणतात तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून 'मकर संक्रांती' असे नाव प्रचलित झाले, यानुसार सूर्याचा मकर राशीतील प्रवेश, वसंत ऋतूचे भारतातील आगमन अशा अनेक परंपरागत समजुती आणि प्रतीके हा सण साजरा करण्यामागे आहेत. ग्रेगोरिअन कॅलेंडरनुसार दरवर्षी सारख्याच तारखेस येणार्‍या काही भारतीय सणांपैकी हा एक सण आहे.

शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने देशातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल १0 हजार ३४९ शेतकर्‍यांनी २0१८ या एकाच वर्षात आत्महत्या केली. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. शेतकरी कर्जमाफी फडणवीस सरकारच्या काळात होऊनही, महाराष्ट्रात तब्बल ३ हजार ५९४ शेतकर्‍यांनी आयुष्य संपवले. महाराष्ट्रात शेतकर्‍यांसह विविध आत्महत्यांचा गेल्या वर्षात हा आकडा १७ हजार ९७२ वर पोहोचला आहे. यामध्ये ३५९४ शेतकर्‍यांचा समावेश आहे.

Thursday, January 9, 2020

प्रेमभंगातून रोज चार मुलांची आत्महत्या

प्रेमात अपेक्षाभंग होऊन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण १८ पेक्षा कमी वयात प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांची संख्या हादरवणारी आहे. २0१८ मध्ये तब्बल १ हजार १३0 तरुणांनी प्रेमातील अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
प्रेमभंगामुळे ४६६ अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केली आहे. तर याच कारणामुळे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या तब्बल ६६५ इतकी आहे. प्रेमभंगामुळे आत्महत्या केल्याच्या देशभरात ५३४२ तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. ज्यातील २0 टक्क्यांहून अधिक जण अल्पवयीन आहेत.

स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक


मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.

Wednesday, January 8, 2020

वीस वर्षांत दुसऱयांदा बलात्काऱ्याला फाशी

नवी दिल्ली:
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा दिल्ली न्यायालयाने कायम ठेवली. न्यायालयाच्या निर्णयाचे जनतेमधून स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या शिक्षेमुळे महिलांवरील अत्याचारांना आळा बसेल असेही मत व्यक्त करण्यात आले. मात्र, गेल्या दोन दशकात बलात्काराच्या घटनेत दुसर्‍यांदाच आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. यापूर्वी २00४ मध्ये धनंजय चॅटर्जी याला फाशी देण्यात आली होती.