Tuesday, January 14, 2020

अभिनेत्रीसुद्धा स्वत:च्या हिंमतीवर 500 कोटी कमावतील


परवा अभिनेत्री विद्या बालनची मुलाखत वाचायला मिळाली. ती सतत महिला सशक्तीकरणविषयी बोलत असते. या मुलाखतीतही तिचा विषय हाच होता. अलिकडेच ती आपल्याला मिशन मंगलमध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत अक्षयकुमार, तापसी पन्नू,नित्या मेनन, कीर्ती कुल्हारी आणि सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. ती म्हणाली की, आता फिमेल स्टार्स पहिल्यापेक्षा अधिक ताकदवान होत आहेत. येणार्या दिवसांत महिला स्टार्स आपल्या ताकदीवर 200 आणि 500  कोटीचे चित्रपट देऊ शकतील. लोकांच्या रुची बदलताहेत. काही महिला प्रधान चित्रपट रिलिज होत आहेत. आणि ते हिटही होत आहेत. अजूनही काही मोठे चित्रपट येत आहेत. हे चित्रपट नवे रिकॉर्ड रचतील, असा तिला विश्वास आहे.

सुरुवातीच्या काळात विद्याला ऑडिशन्समध्ये कित्येकदा रिजेक्शंसचा सामना करावा लागला होता. पण तिने हिंमत हारली नव्हती. या साहसामागे आपले आई-वडील असल्याचे ती सांगते. आई-वडिलांनी माझ्यावर किंवा बहिणीवर कुठले प्रेशर आणले नाही. आपण आपले शंभर टक्के द्यायचं आणि बाकी सर्व देवावर सोडायचे. आपला चित्रपट लोकांना आवडला नाही तर आपण नापास झालो असे होत नाही. फक्त आपला आपल्यावर विश्वास हवा. तिचा आगामी चित्रपट आहे, शंकुतला देवी. हा चित्रपट मे महिन्यात रिलिज होणार आहे. अनू मेनन दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात सान्या मल्होत्रा, जिसू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गणिततज्ज्ञ शकुंतला यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे.

No comments:

Post a Comment