Sunday, January 12, 2020

(माहित आहे का?) चित्रपटांसाठी अमरीश पुरीने सोडली सरकारी नोकरी


आपल्या जानदार अॅक्टिंग, दमदार आवाज आणि कुशल कार्यशैलीच्या जीवावर अमरीशपुरीने हिरो आणि व्हिलेन या दोन्ही क्षेत्रात जबरदस्त काम केले. त्यांचा जन्म 22 जून 1932 मध्ये पंजाबच्या नवांशहरमध्ये झाला होता. रंगमंचावरून चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आलेल्या अमरीशने काही स्मरणात राहणार्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. जवळपास चार दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करून आपली खास ओळख निर्माण केली.12 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अमरीश पुरी लेबर मिनिस्ट्रीमध्ये काम करत होते. त्यांनी आपला फिल्मी सफर करण्याच्या सुरुवातीला स्क्रिन टेस्ट दिली होती. आणि त्यात ते चक्क फेल झाले होते. पण ते थिएटरशी जोडून राहिले. अमरीश या दरम्यान नोकरी सोडणार होते. पण सत्यदेव दुबे यांनी त्यांना सल्ला दिला होता की, चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका मिळत नाहीत, तोपर्यंत नोकरी सोडायची नाही. शेवटी दिग्दर्शक सुखदेव यांनी त्यांना नाटकादरम्यान पाहिले आणि त्यांना आपल्या रेशमा आणि शेरा या चित्रपटासाठी साइन केले. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरसाठी शेवटी नोकरी सोडली.

एका व्हिडिओ इंटरव्यूमध्ये अमरीश पुरी यांनी सांगितले होते की, ज्यावेळेला ते वृतपत्रांना मुलाखत द्यायचे त्यावेळेला पत्रकारांना त्यांची मुलाखत रेकॉर्ड करू देत नव्हते. याचे कारण विचारल्यावर सांगायचे की, माझ्या आवाजावर मी खूप मेहनत घेत आहे. त्यामुले आपल्या हुनर आणि कामाची फी याबाबतीत कोणताच समझोता करत नाही. हिरोपेक्षाही अधिक फी घ्यायचे अमरीश पुरी. अमरीश पुरी यांनी अनेक हिट आणि बेस्ट मूवीज केल्या आहेत. मिस्टर इंडिया, घातक, करण अर्जून, कोयला, नायक, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दोस्ताना, गदर:एक प्रेमकथा, बादशाह आणि दामिनी सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.No comments:

Post a Comment