Wednesday, January 29, 2020

शिक्षकांच्या वरिष्ठवेतनश्रेणीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार

शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील
 सांगली,(प्रतिनिधी)-
प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील यांचा नुकताच  सत्कार केला.यावेळी शिक्षकांचे विविध प्रश्न मांडले. यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना सौ.पाटील यांनी शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न प्रलंबित आहे.  उपशिक्षक 186 पात्र शिक्षक 29, पात्र पदवीधर शिक्षक 7 , विषय शिक्षक पात्र 2 ,वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावेत, अशी  मागणी शिक्षण सभापती सौ. आशाताई पाटील यांचेकडे करण्यात आली.
त्यावेळी बोलताना शिक्षण सभापती म्हणाल्या की सदरचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचे शिक्षण विभागाला आदेश दिले जातील.
सर्व शिक्षा अभियान शाळा खोली बांधकाम एम.बी.
सर्व शिक्षा अभियातून शाळा खोली बांधकामाचे 250 शाळांच्या एम.बी.प्रलंबित आहेत.ते प्रस्ताव मंजूर व्हावेत ही मागणी करण्यात आली. एम.बी.चे पैसे तात्काळ मिळतील यासाठी शिक्षकांनी पदरमोड करून शाळा खोली बांधकाम पूर्ण केले आहे.प्रलंबित एम.बी.तात्काळ मंजूर व्हावेत ही मागणी करण्यात आली.
शिक्षकांना BLO सारखी अशैक्षणिक कामे नकोत असा जिल्हा परिषद शिक्षण कमिटीने ठराव घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली. त्यावेळी बोलताना शिक्षण सभापती आशाताई पाटील यांनी सांगितले असा ठराव शिक्षण कमिटीच्या मिटिंग मध्ये घेतला जाईल. याचबरोबर  शिक्षकांची फंड ना परतावा प्रकरणे वेळेत मंजूर होत नाही त.परिणामी ज्या कारणासाठी पैसे काढले जातात त्या कारणासाठी वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना नाहक त्रास होतो .त्यामुळे फंड ना परतावा प्रकरणे वेळेत मंजूर व्हावेत ही मागणी करण्यात आली.
पेन्शन प्रकरणासाठी शिक्षकांना जिल्हा परिषदेत हेलपाटे मारवे लागतात.तरीही वेळेवर पेन्शन मंजूर होत नाही.पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहत आहेत.त्यासाठी पेन्शन प्रकरण लवकर मंजूर करण्याबाबत कार्यवाही करावी ही मागणी करण्यात आली.
शिक्षकांच्या प्रश्न प्रलंबित राहयलाच नको अशा पद्धतीने शिक्षण विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षक सभापती सौ.आशाताई पाटील यांच्याकडे करण्यात आली.यावेळी सुनील पाटील, दीपक लोंढे, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,सरचिटणीस कृष्णा पोळ,कार्याध्यक्ष सुरेश खारकांडे ,तासगांव अध्यक्ष दीपक काळे,जत अध्यक्ष दिगंबर सावंत,कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोसले,किशोर कांबळे,संभाजी मोहीते,महेंद्र माने,संतोष शेटे,बाळासाहेब सोलनकर,रावसाहेब चव्हाण,मल्लया नांदगांव,सुभाष वाघमारे,प्रकाश डुबुले,बाळासाहेब ओलेकर,नवनाथ संकपाळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment