Monday, January 13, 2020

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी(जत) शाळेचे घवघवीत यश

जत,(प्रतिनिधी)-
  गुड्डापूर  केंद्राच्या केंद्रास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत आसंगी (जत)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवले. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
गुडडापूर येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेचे नियोजन उत्कृष्टपणे  करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण यांच्या हस्ते झाले.त्यावेळी गुड्डापूर केंद्राचे पूर्वीचे केंद्रप्रमुख रतन जगताप यांचा उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून  सत्कार केंद्रातर्फे करण्यात आला.

दरम्यान,केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत गुड्डापूर केंद्रातील आसंगी(जत)शाळेने उत्कृष्ठ प्रदर्शन करत विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.कबड्डी,खो-खो, रिले,धावणे,लॉंग जंप अशा स्पर्धेमध्ये आसंगी (जत)शाळेतील विद्यार्थांनी विविध पदके व प्रमाण पत्र मिळविले आहेत.त्यामुळे आसंगी(जत)शाळेतील विद्यार्थ्यांचे,,शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन गुड्डापूर केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख श्री.सोनवणे यांनी केले होते. आसंगी(जत)शाळेतील विद्यार्थी  विविध क्रीडा प्रकारात भरघोस यश संपादन केले.त्यांना मार्गदर्शन सुभाष हुवाळे,भिमण्णा मणंकलगी, मल्लिकार्जुन कोळी,मुख्याध्यापक कुलकर्णी, तांबोळी ,चव्हाण,सौ.जाधव आदी शिक्षकांनी  केले.

No comments:

Post a Comment