Thursday, January 23, 2020

रवि सांगोलकर यांना समाज गौरव पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री भैरवनाथ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिले जाणारे गौरव पुरस्कार संस्थेने जाहीर  केले असून यावर्षीचा पुरस्कार अंनिसचे युवा कार्यकर्ते रवि सांगोलकर यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार  रविवारी २६ जानेवारी २०२० रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात समारंभपूर्वक दिला जाणार आहे. याबाबत संस्थेने अधिकृत पत्राद्वारे सांगोलकर यांना कळवले आहे. मुळचे मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावचे रहिवासी असणारे सांगोलकर सध्या बनाळी येथे स्थायिक आहेत. ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रमात सहभागी असतात. आयोजन करतात. ग्रामीण भागातील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते त्यांची प्रकाशित पुस्तके स्वखर्चाने विकत घेऊन विविध समारंभात मोफत वितरण करतात. सांगोलकर यांचे 'शिवरायांचा आठवावा साक्षेप' हे पुस्तक प्रसिध्द असून त्यांनी 'चिमणी' या लघुपटाचे लेखनही केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment