Tuesday, January 21, 2020

यंदा मोठ्या प्रमाणावर वाढणार बेरोजगारी

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच आयएलओने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल नोकरदार वर्गास यंदाचे वर्ष हे अत्यंत निराशाजनक ठरु शकणार असल्याचा दावा करतो आहे. अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी (२0२0) बेरोजगारीचा आकडा तब्बल २.५ अब्जपर्यंत वाढू शकतो. 'वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँण्ड सोशल आउटलूक: ट्रेण्ड्स २0२0' अर्थातच (डब्ल्यूईएसओ) नुसार जगभरात आर्धा अब्ज लोक जितके काम करत आहेत त्याच्याही पेक्षा कमी वेतनावर अधिक लोक अधिक तास काम करत आहेत,
करू शकतात त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या कौशल्य आणि अनुभवानुसार काम मिळण्याची शक्यता कमी आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रोजगार आणि सामाजिक बदल यांवर आयएलओचा अहवाल सांगतो की, वाढती बेरोजगारी आणि असमानता वाढण्यासोबतच योग्य कामाची कमी असल्यामुळे असंख्य लोकांना आपल्या कामातून अधिक चांगले जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे.
हा अहवाल सांगतो की, आंतरराष्ट्रीय स्तरावर बेरोजगार समजल्या गेलेल्या १८.८ कोटी लोकांपैकी १६.५ कोटी लोकांजवळ अपुरे वेतन आहे आणि १२ कोटी लोकांनी सक्रीयपणे काम शोधणेच सोडून दिले आहे. काहींची उद्योग आणि व्यवसाय, नोकरीच्या संधी इथपयर्ंत पोहोचत नाही.
आयएलओ महानिदेशक गाय रायडर यांनी म्हटले आहे की, जगभरामध्ये अधिकाधिक लोकांच्या चरितार्थाचे साधन हे आजही कामगार बाजारपेठ किंवा कामगार क्रियाकलाप आहे. मात्र, जगभरातील वेतन कार्य, प्रकार आणि कामाची समानता तसेच त्यांच्या र्शम पाहता त्याचा बाजारात असलेला मोबदला बराच कमी आहे.

No comments:

Post a Comment