Friday, January 24, 2020

भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्व विकास विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

कडेगांव,(प्रतिनिधी)-
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत "भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्व विकास" याविषयावर मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली असल्याची माहिती अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा. बापूराव पवार यांनी दिली.

            आज मानवी जीवन हे विविध माध्यमानी व्यापले आहे. विद्यार्थ्यांनी विविध भाषिक कौशल्य आत्मसात केल्यास वर्तमानपत्रे, विविध टीव्ही चॅनल्स, आकाशवाणी अशा क्षेत्रात  तरुणांना नोकरी मिळू शकते. लिखित माध्यम, दृकश्राव्य माध्यम, श्राव्य माध्यम अशा विविध माध्यमांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून या कार्यशाळेस कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकानी सहभागी व्हावे असे आवाहन या कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक बापूराव पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment