Wednesday, January 29, 2020

जनगणनेसाठी शिक्षकांच्या मेमधील सुट्टय़ा रद्द

शिक्षकांमध्ये खळबळ
जणगणनेसाठी मोठय़ा संख्येने शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्टय़ा रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकार्‍यांनी शिक्षणाधिकार्‍यांना तशा नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे.

२0२१मध्ये जनगणना करण्यात येणार आहे. १ मे २0२0 ते १५ जून २0२0 या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी, घर यादी तयार करणे आदी कामे करण्यात येतील. त्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यासाठी त्यांच्या रजा रद्द केल्या जाणार आहेत. मे महिन्यातील सुट्टय़ा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षातील ७६ पैकी तब्बल ३९ सुट्टय़ांना शिक्षकांना मुकावे लागणार आहे. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात येण्याच्या जनगणना अधिकार्‍यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये जनगणनेसाठी शिक्षकांच्या मेमधील सुट्टय़ा रद्द करण्यात आल्याने  तीव्र नाराजी पसरली आहे. राज्यातील शिक्षकांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध केला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी आहे.
काय आहे नोटिशीत?
जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. पहिला टप्पा हा १ मे ते १५ जून २0२0 मध्ये सुरू होणार आहे. या कालावधीत अनेक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात येणार आहेत. महापालिका, खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडून जाऊ नये, अशा सूचना या नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत. मुख्यालय सोडून गेल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. कोणत्याही कामासाठी शिक्षकच का नेमावे लागत आहेत. त्यांच्या सुट्टय़ांवर गदा का आणली जाते. इतर कर्मचार्‍यांकडे हे काम का सोपवले जात नाही. आम्ही जनगणना अधिकार्‍यांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करू नयेत, अशी मागणी केली जाईल. त्या कालावधीत त्यांना कुटुंबासोबत बाहेर जावे लागते. तसेच काही शिक्षकांना बोर्डाचे पेपर तपासण्याची कामेही दिली जातात, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबईतील कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment