Friday, February 28, 2020

महाराष्ट्रात १ मेपासून पूर्णपणे प्लास्टिक बंदी

राज्यात येत्या १ मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल म्हणजेच एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. राज्यात प्लास्टिक बंदी असूनही काही भागात प्लास्टिक पिशव्यांची देवाणघेवाण सर्रास सुरू आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.

बिळूरमध्ये देशी-विदेशी दारूचा लाखांचा माल जप्त

जत,(प्रतिनिधी)-
 बिळूर (ता. जत) येथे जतच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने दोन ठिकाणी कारवाई करत विना परवाना एक लाख 240 रूपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. काल रात्री  उशिरा 11.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

द्राक्षबाग जाळून दीड लाखांचे नुकसान

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेड्याळ येथे विद्युत तार तुटून गौतम मोटे यांच्या शेतातील द्राक्षबाग जळून दीड लाखाच्यावर नुकसान झाले आहे. मोटे यांच्या शेतावरून पवनचक्कीने विद्युत वाहिन्या ओढल्या आहेत. या वाहिनीतून वीज मंडळ यांना वीज दिली आहे. काल या वाहिनीची तार तुटून मोटे यांची द्राक्ष बाग जळाली आहे. बागेत मणी तयार झाले होते. व ही बाग आठवड्यात विक्रीसाठी जाणार होती. त्यापूर्वीच बागेचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

दुर्मिळ औषधी वनसंपदा जपा: डाॅ. विनोद शिंपले

जत,(प्रतिनिधी)-
भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजाना आहे. या दुर्मिळ औषधी वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने प्रामाणिक प्रयत्न करावा असे प्रतिपादन डाॅ. विनोद शिंपले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, सायन्स असोसिएशन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत "औषधी वनस्पती: ओळख व संवर्धन" या एक दिवसीय कार्यशाळेत 'पश्चिम घाटातील औषधी वनसंपदा' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते.

वाचण्यातून, बोलण्यातून भाषा समृद्ध होते : लवकुमार मुळे

जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो, अनुभवतो आणि आपण जे वाचन करतो त्यातून आपले व्यक्तीमत्व तर घडतेच, पण त्यातून आपली भाषा समृद्ध होण्यासाठीही मदत होते. त्यासाठी सर्वांनी वाचन, मनन, निरीक्षण आणि जाणीवपूर्वक मराठीचा वापर केला पाहिजे, असे मत कवी लवकुमार मुळे यांनी मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव व कविवर्य नारायण सुर्वे कवी मंच, रड्डे यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Thursday, February 27, 2020

एकुंडी ते अनंतपूर रस्त्याचे डांबरीकरण करा

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा               जत,(प्रतिनिधी)-       
 एकुंडी ते अनंतपूर हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणारा मुख्य राज्यमार्ग असूनही शासनाच्या दुर्लक्षामुळे एकुंडी येथे हा रस्ता खराब झाला आहे. प्रवाशांना चालण्यासाठी आणि गाडी चालविण्यासाठी रस्ताच दिसत नाही. रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडूपांचे साम्राज्य वाढले आहे. लोकांना येथून जाताना कसरत करीत चालावे लागते. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठीही त्रास होतो.

मराठी साहित्याला फार मोठी परंपरा- प्रा.सौ.संध्या पाटील

कडेपूर,(प्रतिनिधी)-
साहित्यिकांची खूप मोठी परंपरा  मराठी मातीला लाभली आहे.  त्यामुळेच समृद्ध अशा महाराष्ट्राची जडणघडण झाली आहे. म्हणून महाराष्ट्र संस्कृतीच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे. म्हणून आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार प्राध्यापिका सौ. संध्या पाटील यांनी केले.

Wednesday, February 26, 2020

शाळेत मराठीची सक्ती योग्य, भाषा विकासासाठी हवे प्राधिकरण

मराठीच्या संवर्धनासाठी व्यापक उपाययोजनांची गरज : मराठीतील विविध बोलीभाषांचेही व्हावे जतन
जत,(प्रतिनिधी)-
मराठी ही आपली मातृभाषा. अमृतातेही पैजा जिंके, असे मराठीचे वर्णन संत ज्ञानेश्‍वरांनी केले आहे. मात्र, आज मराठीची अवस्था काय आहे? मराठीला वैभवाचे दिवस आणण्यात आपण सर्व तिची लेकरे कमी पडत आहोत. शासकीय कामकाजात मराठी भाषा असली तरी ती घरातून मात्र हद्दपार होत आहे. आता शासनाने अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे मराठीच्या संवर्धनाला हातभार लागेल. पण केवळ एवढय़ावर भागणार नाही तर मराठीसाठी स्वतंत्र प्राधिकारणही हवे, अशी मागणी केली जात आहे.

Tuesday, February 25, 2020

भोंदू बाबाने केले पाच बहिणींवर अत्याचार

पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये २२ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाचे प्रकाशन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' बालकथा संग्रहाचे प्रकाशन कुपवाड (सांगली) येथे पार पडलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात 'किशोर' मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्याहस्ते पार पडले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सांगली), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन कुपवाड (सांगली) नवकृष्णा व्हॅली  येथे पार पडले. यावेळी लेखक,शिक्षक आणि पत्रकार असलेल्या मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' या बालकथा संग्रहाचे प्रकाशन झाले.

Monday, February 24, 2020

वर्षात 42 हजार लोकांना सर्पदंश


 महाराष्ट्रात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. २0१८-२0१९मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार २६ जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्‍चिम बंगालमध्ये ३६ हजार ८५८ घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या असल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

Sunday, February 23, 2020

संत निरंकारीमार्फत ग्रामीण रुग्णालयांची साफसफाई


जत,(प्रतिनिधी)-
स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर असलेल्या संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशनच्यावतीने संत निरंकारी मंडळाचे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन (दिल्ली) शाखा जत  सेवादल युनिट क्रमांक ११६१  यांनी ग्रामीण रुग्णालय जत येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविले. देशभरामध्ये एकुण १३२० हाँस्पिटलची स्वच्छता करण्यात आली. जत रुग्णालयाच्या आतील भागाची व बाहेरील संपुर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर जत येथील एस. आर. व्ही. एम. हायस्कुल येथेही स्वच्छता करण्यात आली. यामध्ये सुमारे २०० निरंकारी भाविक भक्त सेवादल महापुरुषांनी सहभाग घेतला.

भूमिहीन व बेघरांना शेतजमीन,घरकुल द्या- संजय कांबळे

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हयातील भूमिहीन व बेघरांना शेतजमीन व घरकुल देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.
 राज्यातील भूमीहीनाना पाच एकर जमीन द्यावी याप्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खालील मागण्या करण्यात येत आहेत.गायरान जमिनीवरील १४ एप्रिल १९९० पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्याचा शासन आदेश आहे.

एस.के.कॉम्प्युटर्सचे आमदार सावंत यांच्याहस्ते उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
मुस्लिम समाजातील मुलांना धर्माच्या शिक्षणाबरोबर सार्वजनिक शिक्षण देऊन चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रम सावंत यांनी जत येथे केले.
जत येथे एस. के.कॉम्प्युटर्स सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस या दुकानाच्या उदघाटन सोहळयानिमित्त बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रभाकर कोळी, भुपेंद्र कांबळे, रज्जाकभाई नगारजी, सलीम गंवडी, सलीम पाच्छापूरे, सुनिल गणेश कुलकर्णी यांची होती.

बोर्गी सरपंचांसह सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जत,(प्रतिनिधी)-
जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मुलभूत विकासाची कामे मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच वाड्यावस्त्यांसह जत नगर पालिका क्षेत्रातील दहा गावांच्या विविध विकास  कामाचे प्रस्ताव मी महाविकास आघाडी सरकारकडे सादर केलेअसून ती कामे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेऊ अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी बोर्गी (ता.जत) येथे बोलताना केले.बोर्गी (ता.जत)  येथील सत्ताधारी संरपचासह अनेक सदस्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

Saturday, February 22, 2020

करजगीत घरास आग ; सव्वा लाखाचे नुकसान

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील करजगी येथील मरमसाब मस्तान जतकर यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्यात संसारउपयोगी साहित्यासह रोख रक्कम ,अर्धा तोळे सोन्याचे दागिने असे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले.करजगी -मोरबगी रोडला जतकर यांचे घर वजा छप्पर आहे.शनिवारी सकाळी अचानक घरास आग लागली. बघता बघता आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

येळदरीत विवाहितेची आत्महत्या

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील येळदरी येथील विवाहिता शांताबाई कृष्णा सरगर (वय -30) हिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. औषध पिल्याचे समजताच नातेवाईकांनी तिला जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणत असता ती उपचारापूर्वीच मयत झाली. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मोहिते यांच्या फिर्यादीवरून जत पोलिस ठाण्यात मयताची नोंद झाली आहे.कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केली असावी, असा जत पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Friday, February 21, 2020

एकुंडीत दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप आणि शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आदर्श आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळवंत यमगर होते. यावेळी करिअर मार्गदर्शक आर.वाय.घुटुकडे, जे.के.अकॅडमी (इस्लामपूर)च्या संचालिका संध्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री.घुटुकडे म्हणाले,  विद्यार्थ्यांनी आपले आवडते क्षेत्र निवडावे व त्यात करिअर करावे. आजच्या घडीला शिक्षण महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

एकुंडीत रस्ता कामांचे जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

सरपंचांचा विकास कामांचा धडाका                                  जत,(प्रतिनिधी)-
सरपंच पदाची जबाबदारी घेतल्यानंतर सरपंच बसवराज पाटील यांनी एकुंडी येथे विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. सरपंच पदाची शपथ घेण्यापूर्वीच एकुंडीत स्वखर्चातून पाटील यांनी टँकर उपलब्ध करुन दिला होता. आज  एकुंडीत विविध  विकासकामांचे उद्धघाटन माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार फंडातून गावठाण ते बसवेश्वर मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण, १४ वा वित्त आयोगातून म्हेत्रेवस्ती ते गुड्डोडगीवस्ती शाळेपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण, गुड्डोडगीवस्ती ते लठ्ठीवस्ती ओढा पात्रावर पूल बांधणे यासह लाखो रूपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.

धनगर समाज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आर.एस. चोपडे यांचा सत्कार

जत,(प्रतिनिधी)-
लेखक आर. एस.चोपडे यांची अदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जत तालुका ग्रंथालय संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. आदिवासी धनगर समाज साहित्य परिषदेच्यावतीने चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन 28 व 29 मार्च रोजी सांगोला येथे होणार आहे.  जत येथील वाचनालय सभागृहात झालेल्या समारंभात श्री. चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य चोपडे अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा आणि जत तालुक्यातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचे 'सामान्यातील असामान्य' पुस्तक  भेट देण्यात आले.

Thursday, February 20, 2020

कर्नाटकातील तस्कराकडून आठ लाखांचे दोन मांडूळ जप्त

जत,(प्रतिनिधी)-
   कर्नाटकातील तस्कराकडून जत तालुक्यातील उमदी पोलीसांनी सुमारे आठ लाखांचे दोन मांडूळ जप्त केले.  सदर इसम हा मांडूळ विक्रीसाठी जत तालुक्यातील सीमा भागात आला होता. या प्रकरणी सचिन गणपती भोसले या युवकास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उमदी पोलीस ठाणेचे आधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना तिकोंडी ते तिकोटा कर्नाटक कडे जाणारे रस्त्यावर एक इसम मांडूळ जातीचा सर्प विक्री करण्यास येणार असल्याची खबर मिळाली होती. यावरून  सापळा रचण्यात आला. खबरीनुसार  सचिन गणपती भोसले हा दोन मांडूळ घेऊन आला असता त्यास अटक करून त्याच्या कडील दोन मांडूळ जातीचे सर्प जप्त केले.

विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत:मच्छिंद्र ऐनापुरे

जत,(प्रतिनिधी)-
जीवनात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत, असे आवाहन ज्येष्ठ लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी जिरग्याळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय लोहार होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने 'निर्भया वॉक'

जत,(प्रतिनिधी)-
समाजात विवेक जागृत करणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, प्रा. डॉ.एम.एम.कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली आहे. मात्र खुन्यांचा शोध लावण्यात पोलीस आणि सरकार यांना अपयश आले आहे. हत्येचा छडा लावण्यात यावा,यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जत तालुका शाखेच्यावतीने शहरातून 'निर्भया वॉक' करण्यात आला.

Monday, February 17, 2020

जतमध्ये ऑप्टीकल फायबर इंटरनेट सेवा सुरू

 जत,(प्रतिनिधी)-
ऑप्टीकल फायबर केबलच्या माध्यमातून केबल जाळे पसरले आहे. आता इंटरनेट सुविधाहि या माध्यमातून जत शहरात जाधव ब्रॉडबँड या नावाने इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली.

शेतकरी उत्पन्न वाढीसाठी तालुकास्तरावर समित्या

जत,(प्रतिनिधी)-
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी व उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. याकरिता तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन 25 रोजी

गौतम पाटील संमेलनाध्यक्ष
सांगली,(प्रतिनिधी)-
 येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सांगली व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 6 वे विद्यार्थी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम, कुपवाड एमआयडीसी, सांगली येथे संपन्न होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून गौतम बाहुबली पाटील इयत्ता सातवी,समडोळी यांची निवड झाली आहे.

उमदीत पेट्रोल-डिझेलची वाणवा

दोन्ही पंप रिकामेच ;जादा दराने पेट्रोल घेण्याची वेळ 
उमदी,(वार्ताहर)-
          उमदी-चडचण राज्य महामार्गावर उमदी गावाजवळ दोन कंपन्यांचे दोन पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेलचा कायमस्वरूपी तुटवडा असल्याने व पंप वारंवार बंद राहत असल्याने सर्वसामान्य लोकांना जादा दराने पेट्रोल डिझेल खरेदी करावी लागत आहे. अन्यथा कर्नाटकातील चडचण येथे जाऊन पेट्रोल भरावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या पंप चालकाच्या मनमानी कारभारामुळे वैतागले आहेत. या पंपावर पेट्रोल व डिझेल सुविधा चांगल्या प्रकारे द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू,असा इशारा तालुका पाणी संघर्ष समिती व क्रांती युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे.

'अंनिस' च्या जत तालुकाध्यक्षपदी प्रभाकर सनमडीकर

 कार्याध्यक्षपदी इब्राहिम नदाफ यांची बिनविरोध निवड
जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जत तालुकाध्यक्षपदी प्रभाकर सनमडीकर यांची तर कार्याध्यक्षपदी इब्राहिम नदाफ यांची बिनविरोध करण्यात आली.काल जत येथील बौद्ध विहार येथे   अंनिस कार्यकारणीची निवड घेण्यात आली. इब्राहिम नदाफ यांनी स्वागत करुन वार्षिक अहवाल सादर केला. नंतर श्रद्धा व अंधश्रद्धा यातीत फरक समजावून लहान मुलांचे प्रबोधन केले. अनेक विषयावर चर्चा केल्यानंतर कार्यकारिणी निवड झाली. यावेळी ,सुनिल माने,अर्जून कुकडे व रवि सांगोलकर उपस्थित  होते. दत्तात्रय शिंदे यांनी आभार व्यक्त केले

जतमध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

जत (प्रतिनिधी)-
बंजारा समाजाचे आद्य गुरु संत सेवालाल महाराज यांची २८१ वी जयंती जत येथील गंगा चॅरिटेबल ट्रस्ट व श्री बालाजी को-ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. जत पोलिस ठाण्याकडील पोलिस संतोष चव्हाण यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अग्निकुंडाव्दारे विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विजय नाईक, भिमराव राठोड, भानुदास पवार, जयराम राठोड, शांता राठोड, जत सब रजिस्टर कार्यालयातील जगदीश राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Sunday, February 16, 2020

संपादकांनी दैनिकाचा आपले अपत्य समजून सांभाळ करावा

विट्यात संपादकांची कार्यशाळा संपन्न; पश्चिम महाराष्ट्रातील संपादक उपस्थित
विटा,(प्रतिनिधी)-
पत्रकाराने कुणाचा शत्रू होऊ नये. शिवाय कुणाचे हत्यार बनू नये. ज्याच्या विरोधात काम करता त्याचे सर्व लोक तुमचे विरोधक होतात. हे लक्षात घेऊन राहा.बआपलं दैनिक हे आपलं अपत्य आहे. ते जपा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये यांनी विटा येथे संपादकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.