Sunday, February 16, 2020

संपादकांनी दैनिकाचा आपले अपत्य समजून सांभाळ करावा

विट्यात संपादकांची कार्यशाळा संपन्न; पश्चिम महाराष्ट्रातील संपादक उपस्थित
विटा,(प्रतिनिधी)-
पत्रकाराने कुणाचा शत्रू होऊ नये. शिवाय कुणाचे हत्यार बनू नये. ज्याच्या विरोधात काम करता त्याचे सर्व लोक तुमचे विरोधक होतात. हे लक्षात घेऊन राहा.बआपलं दैनिक हे आपलं अपत्य आहे. ते जपा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये यांनी विटा येथे संपादकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.

विटा येथील इंदिराबाई भिडे प्रश्नाला येथे संपादकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. राजोपाध्ये बोलत होते. ते म्हणाले की,  पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना पहिल्यांदा आपले आरोग्य जपा. तुमचे शरीर,तुमचे अपत्य आणि सर्व क्षेत्रातील नाती जपा. आपली डोकी थंड ठेवा. हृदयात प्रेम ठेवा. जिभेवर साखर ठेवा. याशिवाय कष्ट,जिद्दीची तयारी ठेवा तरच तुम्हाला या क्षेत्रात यश मिळेल. यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करा.
श्री. राजोपाध्ये म्हणाले की, संपादकांनी आपले जाहिरातीचे स्रोत शोधले पाहिजेत. विधायक पत्रकारिता शोधा. वास्तविक अपेक्षाभंगातून पत्रकारिता सुरू होते,याचे भान ठेवा. त्यामुळे बातम्यांची कमतरता भासणार नाही. या क्षेत्रात प्रामाणिकपणा हवा. पटकन श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू नका. लोक बिब्याच्या झाडाला माणसे दगड मारत नाहीत, ते आंब्याच्या झाडाला मारत असतात. चांगल्या माणसाला, चांगले काम करणाऱ्या माणसाला  त्रास होत असतो. त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी ठेवा,असेही राजोपाध्ये म्हणाले.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संपादकांच्या दैनिक, साप्ताहिक, मासिके चालवताना येणाऱ्या अडचणी, संपादकांच्या समस्या यावर चर्चा करण्यात आली. यावेळी संपादकांची संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक लेखणी सम्राटचे संपादक रामदास साळुंखे यांची निवड  करण्यात आली. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासाठी शरद पवार यांची निवड करण्यात आली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रामदास साळुंखे यांनी केले तर आभार संकेत टाइम्सचे संपादक  राजू माळी यांनी मानले. यावेळी संपादकांसाठी गुगलच्या नवलेखा डॅशबोर्ड या पोर्टलची माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment