Monday, February 17, 2020

'अंनिस' च्या जत तालुकाध्यक्षपदी प्रभाकर सनमडीकर

 कार्याध्यक्षपदी इब्राहिम नदाफ यांची बिनविरोध निवड
जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जत तालुकाध्यक्षपदी प्रभाकर सनमडीकर यांची तर कार्याध्यक्षपदी इब्राहिम नदाफ यांची बिनविरोध करण्यात आली.काल जत येथील बौद्ध विहार येथे   अंनिस कार्यकारणीची निवड घेण्यात आली. इब्राहिम नदाफ यांनी स्वागत करुन वार्षिक अहवाल सादर केला. नंतर श्रद्धा व अंधश्रद्धा यातीत फरक समजावून लहान मुलांचे प्रबोधन केले. अनेक विषयावर चर्चा केल्यानंतर कार्यकारिणी निवड झाली. यावेळी ,सुनिल माने,अर्जून कुकडे व रवि सांगोलकर उपस्थित  होते. दत्तात्रय शिंदे यांनी आभार व्यक्त केले

 अन्य कार्यकारणी अशी: जेष्ठ मार्गदर्शक डाॅ श्रीकांत कोकरे, चंद्रसेन माने पाटील,मकबूल गवंडी, उपाध्यक्ष- जकाप्पा सर्जे, प्रधान सचिव दत्तात्रय शिंदे,विविध उपक्रम कार्यवाह अतूल कांबळे,
वैज्ञानिक जाणिव प्रकल्प कार्यवाह- सुनील माने,
बुवाबाजी संघर्ष कार्यवाह- अर्जून कुकडे, वार्तापत्र विभाग कार्यवाह- मच्छिंद्र ऐनापुरे, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह- संतोष गेजगे, प्रकाशन वितरण कार्यवाह- भुपेंद्र कांबळे,प्रशिक्षण विभाग- तायाप्पा वाघमोडे,निधी संकलन- सुनिल सुर्यवंशी, जातीअंत प्रकल्प विभाग- बाबासाहेब काटे,सोशल मीडिया कार्यवाह- खंडू घोडे, युवा सहभाग कार्यवाह- विक्रम ढोणे

 

No comments:

Post a Comment