Monday, February 17, 2020

जतमध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

जत (प्रतिनिधी)-
बंजारा समाजाचे आद्य गुरु संत सेवालाल महाराज यांची २८१ वी जयंती जत येथील गंगा चॅरिटेबल ट्रस्ट व श्री बालाजी को-ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. जत पोलिस ठाण्याकडील पोलिस संतोष चव्हाण यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अग्निकुंडाव्दारे विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विजय नाईक, भिमराव राठोड, भानुदास पवार, जयराम राठोड, शांता राठोड, जत सब रजिस्टर कार्यालयातील जगदीश राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संत सेवालाल महाराज यांची अंधश्रद्धा, सद्विचार, शांती याबाबतीतील उपदेश आजही सर्व समाजाला मार्गदर्शक आहेत. विज्ञानवादी दृष्टीकोन समोर ठेऊन अशिक्षित समाजास जागॄत करण्याचे काम महाराजांनी लडी, भजन व दोहे या माध्यमातून करून समाजातील अनिष्ट रूढी व कर्मकांडाला विरोध केला, असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी ट्रस्टचे सचिव सौ. सीमा नाईक, सौ. शारदा नाईक, रवी राठोड, पतसंस्थेचे संचालक सुरेश चव्हाण व सर्व संचालक उपस्थित होते. शेवटी पतसंस्थेचे संचालक करण राठोड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment