Friday, February 21, 2020

धनगर समाज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आर.एस. चोपडे यांचा सत्कार

जत,(प्रतिनिधी)-
लेखक आर. एस.चोपडे यांची अदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जत तालुका ग्रंथालय संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. आदिवासी धनगर समाज साहित्य परिषदेच्यावतीने चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन 28 व 29 मार्च रोजी सांगोला येथे होणार आहे.  जत येथील वाचनालय सभागृहात झालेल्या समारंभात श्री. चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य चोपडे अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा आणि जत तालुक्यातील लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचे 'सामान्यातील असामान्य' पुस्तक  भेट देण्यात आले.

यावेळी  जतच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर  ,जत तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, सचिव अमर जाधव, माजी जि. प. सदस्य दिलीप वाघमोडे ,संचालक श्री. सरगर , बेवनुर हायस्कूलचे श्री. शिंदे,   सरसंचालिका सौ. वाघमोडे आदी उपस्थित होते.
 सांगोला येथे होणाऱ्या चौथ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे यांची निवड झाली आहे.
 टि. के. शेंडगे यांनी मागासलेल्या बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी 1960 साली महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीची स्थापना करत 2 माध्यमिक विद्यालय सुरु केली. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू प्राचार्य आर एस चोपडे यांनी अत्यंत दुर्गम भागात मागासलेली अज्ञान अंधश्रद्धा यामध्ये पिचलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी 14 माध्यमिक 5 उच्च माध्यमिक 5 प्राथमिक 5 वसाहत व 1 विद्यालय स्थापन करून खऱ्या अर्थाने वंचित समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम केले. आज सांगली, सातारा, सोलापूर आधी जिल्ह्यात संस्था कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्थेमध्ये ‘अहिल्या पॅटर्न’ राबविला.
आटपाडी तालुक्यातील पाणी परिषदेच्या चळवळीत सुरुवातीपासून आज अखेर ते सक्रिय राहून स्व. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी त्यांच्या पश्चात वैभव नायकवडी चळवळीतील मंडळा सोबत सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कायम सोबत राहिले. हे करताना धनगर समाजाचे प्रश्न सुटावेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रश्न  शासन दरबारी मांडण्यात प्राचार्य चोपडे यांची भूमिका निर्णायक ठरलेली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत असतो तो सोडवण्यासाठी वैचारिक अभ्यासपूर्वक मांडण्याची गरज असून त्यातही आर. एस. चोपडे कार्यरत असतात.

No comments:

Post a Comment