Friday, February 28, 2020

बिळूरमध्ये देशी-विदेशी दारूचा लाखांचा माल जप्त

जत,(प्रतिनिधी)-
 बिळूर (ता. जत) येथे जतच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने दोन ठिकाणी कारवाई करत विना परवाना एक लाख 240 रूपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. काल रात्री  उशिरा 11.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

   पोलिसांनी आनंदा चिदानंद आपराज उर्फ नंदू मुडेगोळ व मांतेश गुंडाप्पा धोडमणी (दोघेही रा. बिळूर, ता. जत) या दोघांविरोधात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून कारवाई दरम्यान दोघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत.
  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस उपअधीक्षक दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, पोलिस नाईक सुनिल व्हनकंडे पथक बिळूर येथे कारवाईस पाठविण्यात आले होते. आनंदा आपराज याने बिळूर गावातच मॅक्डाॅल नंबर वन 180 मिलीच्या व्हीस्कीच्या बाटल्या विना परवाना विक्री करत होता. याठिकाणी 86 हजार 400 चा मुद्देमाल तर मांतेश धोडमणी यांने देशी संत्रा, टँगो पंंचच्या 180 मिलीच्या 104 बाटल्या, व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 32 बाटल्या, त्याची एकूण 13 हजार 840 किंमत होते. घटनास्थळावरून दोन्ही आरोपी फरार झाले असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

No comments:

Post a Comment