Sunday, February 23, 2020

भूमिहीन व बेघरांना शेतजमीन,घरकुल द्या- संजय कांबळे

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हयातील भूमिहीन व बेघरांना शेतजमीन व घरकुल देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.
 राज्यातील भूमीहीनाना पाच एकर जमीन द्यावी याप्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खालील मागण्या करण्यात येत आहेत.गायरान जमिनीवरील १४ एप्रिल १९९० पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्याचा शासन आदेश आहे.
त्यात सुधारणा करून १५ एप्रिल २०१५ पूर्वीचे गायरान जमिनी वरील अतिक्रमण नियमित करणारा शासन निर्णय सरकार ने घ्यावा, जिल्हयातील भूमिहीनांना उदरनिर्वाहाचे साधन नाही भूमीहीनांना ५ एकर जमीन कसण्यासाठी द्यावी,  मागासवर्गीयांचा सरकारी नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा, बेरोजगारांना रोजगार द्यावा रोजगार देता येत नसेल तर बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा.
बेघरांना मोफत घरकुल योजना द्यावी, अंकलखोप येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोकार्पण करून पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, जतचे भ्रष्टाचारी मंडळ आधिकारी संदीप मोरे व तलाठी रविंद्र घाडगे यांना निलंबित करावे, अशा प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांचा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करून मान्य कराव्यात अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय कांबळे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment