Friday, February 21, 2020

एकुंडीत दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप आणि शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आदर्श आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळवंत यमगर होते. यावेळी करिअर मार्गदर्शक आर.वाय.घुटुकडे, जे.के.अकॅडमी (इस्लामपूर)च्या संचालिका संध्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री.घुटुकडे म्हणाले,  विद्यार्थ्यांनी आपले आवडते क्षेत्र निवडावे व त्यात करिअर करावे. आजच्या घडीला शिक्षण महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

यावेळी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या. आदर्श विद्यार्थी राहुल म्हेत्रे व आदर्श विद्यार्थिनी कु.प्रीती गुडोडगी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांचे 'सामान्यातील असामान्य' पुस्तक भेट देण्यात आले. महादेव पाटील यांनी शाळेला कूपनलिका खोदण्यासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली.
 प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णदेव पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन आय.पी.चौगुले यांनी केले तर आभार प्रा. श्री. दड्डाणावर  यांनी मानले.
यावेळी सरपंच बसवराज पाटील, केंद्रप्रमुख रतन जगताप, श्री. बेले, बाळासाहेब जायभाय, सूर्यकांत राठोड, चंद्रकांत यमगर, माजी सरपंच चिदानंद पाटील, सुरेश शेंगणे, गणेश चौगुले, खलाटी हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सर्जेसर, डोर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सरगर, एस.डी. ओलेकर, पी.एल.मोटे, प्रा. कांबळे, प्रा. सौ. कांबळे उपस्थित होते.

( एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी-बारावी विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.)

No comments:

Post a Comment