Thursday, February 20, 2020

कर्नाटकातील तस्कराकडून आठ लाखांचे दोन मांडूळ जप्त

जत,(प्रतिनिधी)-
   कर्नाटकातील तस्कराकडून जत तालुक्यातील उमदी पोलीसांनी सुमारे आठ लाखांचे दोन मांडूळ जप्त केले.  सदर इसम हा मांडूळ विक्रीसाठी जत तालुक्यातील सीमा भागात आला होता. या प्रकरणी सचिन गणपती भोसले या युवकास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उमदी पोलीस ठाणेचे आधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना तिकोंडी ते तिकोटा कर्नाटक कडे जाणारे रस्त्यावर एक इसम मांडूळ जातीचा सर्प विक्री करण्यास येणार असल्याची खबर मिळाली होती. यावरून  सापळा रचण्यात आला. खबरीनुसार  सचिन गणपती भोसले हा दोन मांडूळ घेऊन आला असता त्यास अटक करून त्याच्या कडील दोन मांडूळ जातीचे सर्प जप्त केले.
मांडूळ जप्त करण्याची ही सांगली जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. परवा विटा पोलिसांनी एका इसमास दहा लाखाचे मांडूळ जप्त केले होते. मांडूळ पैशांचा पाऊस पडतो, अशी धारणा असल्याने मोठ्या प्रमाणात मांडूळांचीही विक्री होत आहे.
   पोहेकॉ 746 बसवराज कोष्टी , पो.शिपाई 1796 विक्रम गोधे, पोशी 556 इंद्रजीत गोधे  यांना पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कार्यवाहीचा आदेश देण्यात आला होता त्यानुसार पोहेकॉ  746 कोष्टी यांच्या टीमने सचिन गणपती भोसले वय 19 वर्ष रा. जालिगिरी ता. विजयपूर जि. विजयपूर (कर्नाटक) यास ताब्यात घेतले. त्याने  2 मांडूळ जातीचे सर्प विक्री करीता घेऊन आल्याचे पोलिसांना सांगितले. दोन पंचा समक्ष त्याचा पंचनामा करण्यात आला तेव्हा त्याची किंमत अंदाजे आठ लाख रुपये  असलेचे  समजले. त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्याच्यावरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व  वनाधिकारी यांना सदर मांडूळ मिळाल्याचे कळवण्यात आले. त्यानुसार उमदी पोलीस ठाणेकडील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदाळे यांचे समक्ष वनाधिकारी यांच्याकडे दोन्ही मांडूळ सर्प ताब्यात देण्यात आले .

No comments:

Post a Comment