Saturday, March 7, 2020

आसंगी शाळेतील दादासो गायकवाड 100 मी. धावण्यात जिल्ह्यात प्रथम

माडग्याळ,(प्रतिनिधी)-
सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी (जत) शाळेचा विद्यार्थी दादासो गायकवाड याने 100 मीटर धावणे या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आसंगी (जत) ला यश मिळवून दिले. या यशामुळे आसंगी (जत) शाळा आणि ग्रामस्थांमधून गायकवाड चे कौतुक होत आहे. या विद्यार्थ्याला क्रीडा प्रशिक्षक सुभाष हुवाळे यांच्यासह शाळेतील  इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेआहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या शिक्षकांचा सन्मान  करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावच्या नागरिकांनी अभिनंदन पर कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी  मुख्याध्यापक शशिकांत कुलकर्णी , मल्लिकार्जुन कोळी, भिमणा मनंकलगी(पाटील) रावसाहेब चव्हाण , स्वाती जाधव मोहसीन तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.व सरपंच श्रीमंत पाटील, उपसरपंच विकास जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ कोळी व सदस्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment