Sunday, March 29, 2020

आमदार सांवत यांच्याकडून आरोग्य यंत्रणेसाठी 10 लाखाचा निधी

जत तालुक्यात सर्व यंत्रणा दक्ष
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात कोरोना विषाणु प्रभाव रोकण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आमदार निधीतून 10 लाख रूपयाचा निधी दिला आहे.तसे पत्र प्रशासनाला आ.सांवत यांनी आज रविवारी दिले.  या विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वोच्च खबदारी घ्या,कसल्याही परिस्थिती निधी कमी पडू देणार नाही,असे आश्वासन ही आ.सांवत यांनी प्रशासनाला दिले. देशामध्ये कोरोना या रोगाने थैमान घातले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तातडीने उपाय योजना करता याव्यात  यासाठी विशेष बाब म्हणून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य तात्काळ उपलब्ध करून देता यावी, म्हणून राज्य सरकारने आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमा अतर्गंत 50 लाख रूपये पर्यंत खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी काम करत असलेले आरोग्य विभागाचे डॉक्टर्स,कर्मचारी,नर्स,आशा वर्कस् यांच्या सुरक्षेसाठी लागणारे पर्सनल प्रोटेक्शन इक्कीपमेंटस् किट्स, फेस मास्क, ग्लोव्हज, सँनिटायझर व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअतर्गंत 10 लाख रूपयाचा निधी देत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती मी जनतेच्या पाठिशी आहे.तालुक्यात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षम आहेत.प्रशासनाकडून पुर्ण दक्षता घेण्यात येत आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही आ.सांवत यांनी केले.
आमदार सावंत यांनी आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या तसेच जतेत आढावा बैठक घेतली. जत तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांना आमदार सांवत हे भेटी देऊन तेथील उपाययोजनाची माहिती घेत आहेत.रविवारी त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यासमवेत बैठक घेत आढावा घेतला.सर्व प्रकारे खबरदारी घ्या,कोणत्याही अडचणीसाठी मला कळवा,सरकारकडून सर्वप्रकारे मदत मिळवू असे आश्वासन अधिकाऱ्यांना आ.सांवत यांनी दिले.

No comments:

Post a Comment