Friday, March 13, 2020

वाषाण शाळेचे विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आले होते.  या स्पर्धेत जत तालुक्यातील डफळापूर केंद्रातील वाषाण शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. 50×4 रिले लहान गट मुली या क्रीडा प्रकारात जिल्हात प्रथम येण्याचा मान पटकावला. यामध्ये कु.प्रिया दौलत पाटील, कु.निकीता विजय गडदे, कु.आरती आनंदा सरगर, कु. राजवी अनिल गडदे, कु. अंकिता भारत गडदे, कु. शितल संभाजी गडदे या विद्यार्थीनीनी सहभाग घेतला होता.

         तसेच याच शाळेतील विद्यार्थीनी कु.प्रिया दौलत पाटील हिने 100मी.धावणे  लहान गट मुली या क्रीडा प्रकारात जिल्हात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. सातत्य, सराव व चिकाटीच्या जोरावर या मुलींनी हे यश निर्विवाद प्राप्त केले.  वाषाण सारख्या छोट्या शाळेने जिल्हास्तरीय स्पर्धेत दोन क्रीडा प्रकारात मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून शाळेचे अभिनंदन होत आहे.
   या विद्यार्थ्यांना सांगली जि.प.अध्यक्षा सौ.प्राजक्ता कोरे , प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. सुनंदा वाखारे  यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांना जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर. डी.शिंदे, विस्तार अधिकारी तानाजी गवारी, केंद्रप्रमुख  बेले, उद्योगरत्न  संकपाळ ,शाळेचे मुख्याध्यापक  किशोर पाटील,सिद्राम  जाधव, प्रविण साळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील व सर्व सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ.सुनंदा अधिक पांढरे, उपसरपंच सौ.शकुंतला सुभाष पाटील व सर्व सदस्य तसेच पालक दौलत पाटील,अजित चौगुले, शिवाजी बापू गडदे, तसेच क्रीडा प्रेमी व शिक्षण प्रेमी यांनी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शाळा यांचे विशेष अभिनंदन केले आहे.  वाषाण गाव व जत तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment