Friday, March 27, 2020

एकुंडी ग्रामपंचायतीच्यावतीने निर्जंतुकीकरण


जत,(प्रतिनिधी)-
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायत येथे सरपंच बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समिती स्थापना करण्यात आली.  ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून परगावाहून आलेल्या नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

    सरपंच श्री. पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली. गावातील गर्दीची ठिकाणे, ग्रामपंचायत परिसर, प्रमुख देवालयासमोर, प्रमुख रस्ते, चौक आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
   यावेळी ग्रामसेवक आर.के.माळी, तलाठी श्रीमती थोरात, आरोग्य सेवक श्री. माने, कृषिसहाय्यक श्री. बसरगी, सर्व अंगणवाडी सेविका, आशासेविका उपस्थित होते.  ग्रामपंचायतचे क्लार्क संतोष कोंडे, डाटा अॉपरेटर महांतेश म्हेत्रे, ग्रामपंचायत शिपाई पिरगोंडा मगदूम यांनी निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामामध्ये सहभाग घेतला. गावातील ग्रामस्थांनी लॉकडाऊनच्या काळात घरीच बसावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच श्री.पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment