Saturday, March 14, 2020

उटगी येथील उर्दू शाळेच्या वर्ग खोलीचे उदघाटन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उटगी येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या नवीन वर्ग खोली व  सीसॉ खेळणीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी पाटील, सरपंच भीमराया बिराजदार यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही तम्मणागौडा रवीपाटील  यांनी भूषविले. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.श्री.रवीपाटील म्हणाले,शाळेची गुणवत्ता व कलागुण गौरवणे सारखी आहे दर्जेदार शिक्षण येथे मिळत आहे. शाळेच्या विकासासाठी वॉल कंपाऊंड  किंवा जी मदत लागेल ती मदत आम्ही देऊ असे आश्वासन दिले. बिळूर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती समीना  व श्री.जुबेर यांनी मातृभाषेत शिक्षण किती गरजेचे आहे हे पटवून दिले व मुख्याध्यापक श्री. पटेल  व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 
            या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर नाटिका,विविध गाणी,कविता तसेच विनोदी नाटिका सादर केल्या. सदर कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला
कार्यक्रमास सोसायटीचे माजी अध्यक्ष जिनेसाब खानापुरे,लालसाब गुडड्पुरे, विजय लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक महांतेश पाटील, ईरप्‍पा बिराजदार, सर्व सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन  केसगोंड पत्रकार महादेव कांबळे, भारत शिक्षण संस्थेचे श्री. राचगोंड, शिक्षक  श्री. हिरेमठ , श्री. कोळी, डॉ.सिकंदर खानापुरे, सोसायटीचे सेक्रेटरी लियाकत नंदूर, टायगर ग्रुप चे अध्यक्ष बिलाल तिकोंडी,दशरथ कोळी, उमर खानापुरे, चंद्रकांत डोळी,केसगोंड,शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गांधी चौगुले,  श्री.नदाफ बगली, बोर्गी , कांबळे ,काटे,मतवाल , श्रीमती दाभाडे , मौलाना आझाद हायस्कूल जतचे मुख्याध्यापक रियाज,  गावातील पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक नजीबपाशा पटेल  यांनी केले.

No comments:

Post a Comment