Monday, March 16, 2020

के. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक सय्यद यांना ज्ञानरत्न पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील के.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक रियाज सय्यद यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या वतीने त्यांना मा. विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार २०२० देऊन गौरविण्यात आले.
नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षक साहित्य संमेलनात मुख्याध्यापक रियाज सय्यद  यांना पुरस्कार देऊन व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
लातूर येथे नुकतेच पार पडलेल्या सातव्या राज्यस्तरीय काँग्रेस शिक्षक साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी जोडले गेलेल्या काँग्रेस शिक्षकांनी लातूर येथील संमेलनास हजेरी लावली.
शैक्षणिक क्षेत्राशी अत्यंत प्रामाणिक व कार्यतत्पर असलेले शहरातील प्रतिष्टीत मानल्या जाणाऱ्या येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित के.एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य  रियाज सय्यद यांना स्वर्गीय विलासराव देशमुख ज्ञानरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा शिक्षक ते विषय शिक्षक अशी दोन्ही कामे सांभाळून गेली 25ते 30 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहेत. पदोन्नतीने ते आत्ता दोन वर्षे प्राचार्य या पदावर सेवेत आहेत. पुरस्काराबद्दल त्यांचे जत शहरातून कौतूक होत आहे.

No comments:

Post a Comment