Monday, March 30, 2020

कोरोनामुळे मोलकरणींचे आर्थिक हाल

जत,(प्रतिनिधी)-
जतसारख्या शहरी भागात उच्चवर्गीय लोक धुण्या- भांडी, स्वच्छतेसाठी व स्वयंपाक करण्यासाठी मोलकरीण ठेवण्यात आल्या होत्या. त्या मोलकरीनाना कोरोना मुळे सुट्टी देण्यात आली आहे. काम नसल्याने मोलकरणींचे आर्थिक हाल होत आहेत. त्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

मोलकरणींची संख्या जत शहरात जास्त असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोलकरीण या तीन ते चार घरचे काम करून आपला संसार चालवित असतात. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या धास्तीने अनेक कुटुंबांनी त्यांच्या घरातील मोलकरणींना सुट्टी दिली आहे. आम्ही सांगू तेव्हा कामावर परत या असे सांगून या मोलकरणींना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. परंतु,या सर्व परिस्थितीमुळे अनेकींना आपल्या रोजगाराची चिंता लागली असून आपल्याला परत कामावर बोलावतील का,जेवढ्या दिवसांची सुट्टी होईल त्याचा पगार मिळेल का असे प्रश्न याकष्टकरी महिलांना सतावू लागले आहेत. जत शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कांही नाही. मात्र पाच ते सहा घरची कामे करून आपल्या घरी मोलकरीण आल्याने आपल्यालाहि कोरोनाचा प्रादुर्भाव होईल म्हणून मोलकरीणीला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या धास्तीने स्वतः नोकरदार व उच्चवर्गीय महिला आपल्या घरातील कामे करू लागली आहेत.

No comments:

Post a Comment