Friday, March 20, 2020

जयसिंगपूर अपघातात उमदीचा युवक ठार

जत,(प्रतिनिधी)-
  शिरोळ येथे झालेल्या ट्रॅक्टर अपघातात उमदी येथील एक जण ठार झाला. भीमाशंकर चिदानंद ऐवळे  वय 20 रा. उमदी ता. जत जि. सांगली  असे ठार झालेल्या चे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मूळ उमदी येथे असणारे भीमाशंकर चिदानंद ऐवळे यांनी ऊस तोडणीसाठी दत्त साखर कारखाना मार्फत शिरोळ येथे ऊस तोडणीसाठी गेले होते.
गुरुवारी दिवसभर ऊस तोडून झाल्यानंतर, ड्रायव्हर बरोबर तो ट्रॅक्टर सोबत दत्त साखर कारखान्याला गेला होता. शुक्रवारी ट्रॅक्टर खाली करून येत असताना स्पीड ब्रेक आल्यानंतर गाडी आदळल्याने तो खाली पडल्याने ट्रेलरच्या चाकात अडकून मृत्यू झाला. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment