Monday, March 30, 2020

गणेश बागडे यांच्याकडून गरीबांना साबण व हँडग्लौज वाटप

उमदी,(वार्ताहर)-
 जत तालुक्यातील उमदी खालील विठ्ठलवाडी येथे 'आपला माणुस पोलीस मित्र' संस्था (महाराष्ट्र राज्य) सांगली जिल्हा अध्यक्ष गणेश बागडे(दै.जनमतचे पत्रकार) व टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य विठ्ठलवाडी (उमदी) ता.जत जि.सांगली यांच्याकडुन गरीब कुंटूबाना मदत करण्यात आली.
गरीब कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे यासाठी  त्यांच्याकडुन डेटाॅल साबण,हाॅण्ड गोलज,बिसलरी पाणी बाॅटल वाटप करण्यात आल्या.
ग्रामीण भागात फक्त पाण्याने हात धुऊन लगेच जेवायला बसतात. गरीब लोकांकडे खाण्यासाठी पैसे नसतात तर साबण किंवा हण्ड्ग्लोज कसले घेणार, सवाल उपस्थित होतो. यामुळे पत्रकार गणेश बागडे यांनी विठ्ठलनगर मधील टायगर ग्रुपच्या मित्रांना एकत्र घेऊन असे साहित्य वाटण्याचे ठरविले त्यानुसार गरीब लोकांना तसेच वाडी- वस्ती वरील शेतमजूरांना डेटाॅल साबण,हाॅण्ड गोलज,बिसलरी पाणी बाॅटल वाटप करण्यात आले.गणेश बागडे यांनी यापूर्वी संचारबंदी काळात पोलिसांच्या मदतीसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. त्यामुळे बागडे यांचे कार्याबद्दल कौतूक होत आहे. यावेळी टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment