Saturday, March 14, 2020

मराठी साहित्य सेवा मंचच्या अध्यक्षपदी किरण जाधव

कार्याध्यक्षपदी मोहन माने पाटील
जत,(प्रतिनिधी)-
जत मराठी साहित्य सेवा मंचच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे पत्रकार व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष किरण जाधव यांची निवड करण्यात आली. शेगाव येथे पार पडलेल्या संस्थेच्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी अन्य कार्यकारणीही जाहीर करण्यात आली. संस्थेच्या  उपाध्यक्षपदी कवी रावसाहेब यादव, कार्याध्यक्ष पदी मोहन मानेपाटील,सचिवपदी रशीद मुलाणी, कार्यवाह म्हणून शिवाजी संकपाळ यांची निवड झाली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक महादेव बुरुटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य सेवा मंचची वार्षिक बैठक शेगाव येथे पार पाडली. हे वर्ष मंचचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून या वर्षात स्मरणिका काढण्याबरोबरच डफळापूर येथे पुढील महिन्यात काव्यमैफल घेण्याचे ठरले. नवोदित व मुलांसाठी काव्यनिर्मिती कार्यशाळा घेण्याचेही ठरले.
या बैठकीला कवी लवकुमार मुळे, साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, राजेश कोळी, श्रीकांत कोकरे, माणिक कोडग, कुमार इंगळे, विजय नाईक, रवी सांगोलकर, शफीक इनामदार, श्रीकृष्ण पाटील, सुनील देशमुख, राजू कुलकर्णी, विष्णू शिंदे, के.डी.जाधव, मारुती यादव, मारुती घोडके, राजू कोळी,डॉ.  महेश भोसले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment