Thursday, March 5, 2020

संशयास्पद फिरणाऱ्या दरोडेखोरास जतमध्ये अटक

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरात मध्यरात्री दरोड्याच्या तयारी असताना रात्रीच्या गस्त पथकाला चार ते पाच सराईत गुन्हेगारी आढळून आले.दरम्यान पथकाने पाठलाग केला असता दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यात एकाला पकडण्यात पोलीसांना यश आले तर अन्य चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.यात झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

मोहन मच्छिद्र चव्हाण (वय 31 रा. पारधीतांडा जत)असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव असून याबाबत जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,बुधवारी मध्यरात्री जत पोलीसाचे पथक गस्त घालत असताना संभाजी चौकादरम्यान पाच दरोडेखोरांची टोळी संशयास्पद हालचाली करताना आढळून आली.पोलीसांनी त्यांना हाटकले,मात्र ते तेथून  पळू लागल्याने पोलीसांनी पाठलाग केला.त्यात चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
मोहन मच्छिंद्र चव्हाण याला पकडत असताना त्याने पोलीस नाईक प्रविण पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला.तरीही पाटील यांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले.मात्र यात पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान दरोडेखोर मोहन मच्छिंद्र चव्हाण याच्याकडून कटावणी,स्क्रू डायवर,चटणी,बॅटरी असे साहित्य आढळून आले.अन्य फरारी चौघा दरोडेखोरांचा तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment