Monday, March 30, 2020

'कोरोना प्रतिबंध' साठी जि. प. स्वीय निधी वापरावा

प्रकाश जमदाडे 
जत,(प्रतिनिधी)-
मास्क, सॅनिटायझर , जंतूनाशक औषध फवारणीसाठी व गोरगरीब जनतेसाठी जि.प.स्वीय निधी उपयोगात आणावा, अशी  मागणी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.
कोरोना महामारी विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहात याचा अभिमान आहे. तालुका प्रशासनही अहोरात्र काम करीत आहे परंतु ग्रामीण भागामध्ये मास्क , सॅनिटायझर व जंतूनाशक औषधे इ. आवश्यक साहित्य उपलब्ध नाही ,तरी जि.प.स्वीय निधीतून
लोकसंख्येनुसार गावनिहाय साहीत्य पुरवावे. तसेच संचारबंदी लागू झाले पासून कामगार, शेतकरी ,सुशिक्षित बेकार, छोटे-छोटे व्यापारी किरकोळ विक्रेते घरातच बसून आहेत ज्यांचे हातावरती पोट आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या ८ दिवसापासून कुठेही काम नाही बाहेरही जाता येत नाही त्यांची उपासमार चालू आहे. तरी ग्रामीण भागातील ६० जि.प.मतदारसंघातील नोकदार ,पेन्शनर ,उदयोजक व आयकर भरणारे व्यक्ती यांना वगळून कामगार, शेतकरी ,सुशिक्षित बेकार युवक यांना जि.प.स्वीय निधीतून रू.५०००/-(पाच हजार )त्यांचे खातेवर जमा करणेत यावेत म्हणजे या गरीब लोकांना तेवढाच आधार होईल, असेही जमदाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment