Tuesday, March 31, 2020

डॉ . बलभीम मुळे स्मृती फाऊंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगाव येथील डॉ. बलभीम मुळे फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या साहित्यकृतींच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष लवकुमार मुळे यांनी घोषणा करताना सांगितले की, या उपक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १२५ साहित्यकृती आल्या होत्या. त्यांच्या लेखनाची शैली, मांडणी, विचारांची दिशा, अभिव्यक्तीचे स्वरुप तसेच पुस्तकांची बांधणी आणि सादरीकरण इत्यादी वैशिष्ट्ये पाहून पुरस्कार देण्यात आले आहेत.

डॉ. बलभीम मुळे स्मृती उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार 'टिंब' (डॉ. सुधीर देवरे, सटाणा, जि. नाशिक - सहित प्रकाशन, गोवा) व डॉ. बलभीम मुळे स्मृती उल्लेखनीय कादंबरी पुरस्कार 'हक्कसोड' (मिलिंद जाधव, चिखली, जि. बुलढाणा - लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई) या पुस्तकांना मिळाला आहे.  प्रभाकर चव्हाण स्मृती उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार 'कायधूळ' (दिनकर कुटे राजूरी, जि. सोलापूर, हर्मिस प्रकाशन, पुणे) तसेच प्रभाकर चव्हाण स्मृती उल्लेखनीय कथासंग्रह पुरस्कार 'वाताहत' (अनंता सुर, वणी, जि. यवतमाळ - प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव) यांना दिले आहेत. प्रभाकर चव्हाण स्मृती ललितलेखन पुरस्कार 'गाई गेल्या राना' (रविंद्र जवादे, मुर्तिजापूर, शब्ददीप प्रकाशन, मुर्तिजापूर) या पुस्तकाला जाहीर झाला असून विठाई स्मृती काव्यसंग्रह पुरस्कार पिळ' (सुनील यावलीकर, अमरावती, मिडिया वॉच पब्लिकेशन्स, अमरावती) व 'थ्रिशोल्ड फ्रिक्वेन्सी घेऊन' (डॉ . संघमित्रा खंडारे, दर्यापूर, जि. अमरावती - संवेदना प्रकाशन, पुणे) यांना विभागून देण्यात आला आहे. यावर्षी विशेष उल्लेखनीय साहित्य पुरस्कारासाठी व्यक्तीविशेष ललित 'रेशिमबंध' (मिरा, बेळगाव सहित प्रकाशन , गोवा) आणि कादंबरी 'काळीजकाटा' (सुनील जवंजाळ, चोपडी, जि. सोलापूर - चपराक प्रकाशन, पुणे) यांना घोषित करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment