Monday, March 30, 2020

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने व्याज दर कमी करावा

जत,(प्रतिनिधी)-
 नुकताच रिझर्व बँकेने एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की,  कर्जावरील तीन  महिन्याचे हप्ते  स्थगित ठेवणे तसेच कर्जावरील व्याजदर ही कमी करण्याबाबत  सदर निर्णय हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने आपल्याही बँकेच्या सभासदांना दिलासा देण्यासाठी  कर्जावरील व्याजदर कमी करावा, अशी मागणी शिक्षक सभासदांकडून करण्यात आले3 आहेत.

  आता आरबीआयने  जाहीर केलेल्या निवेदनात  आरबीआयचे गव्हर्नर  शक्तीकांत दास यांनी  कर्जातील तीन हप्ते  स्थगित करण्याचा  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला  आणि व्याज दरातही  रेपो दर व रिव्हर्स रेपो दर  यात कपात केलेली आहे.असे निवेदन केले आहे. त्याप्रमाणे  सत्ताधारी मंडळाला  सभासदांचे हित  खऱ्या अर्थाने जपायचे असेल तर  कर्जावरील व्याजदर  एक टक्क्याने कमी करणे गरजेचे आहे. अशी मागणी सभासदांच्या वतीने करण्यात आली आहे.
  सभासदांच्या हितासाठी  जेवढे अनेक निर्णयाची मागणी  सभासद करत असतात  त्यावेळी बँकेच्या शिपायापासून   MD पर्यंत  तसेच संचालकां पासून  तर अध्यक्ष आणि  मंडळाचे नेत्यापर्यंत,जनरल मिटींगमध्ये आरबीआयच्या नियमांचे उच्चारन केले जाते.  मग आता  आरबीआयने  कर्जावरील व्याजदरात  कपात केली असल्याने  बँकेला तो निर्णय घेण्यात  काय अडचण निर्माण होऊ शकते? तसेच  जर काही कारणास्तव  पगार विलंबाने झाले तर कर्जावरील हप्ता  बिनव्याजी स्थगित ठेवून    भविष्य काळामध्ये  तो वसूल करावा.  आरबीआयने जारी केलेला निर्णय  जर सर्वच  सरकारी बँक,  सहकारी बँका , खाजगी बँका  आणि फायनान्स ला सुद्धा  लागू होतो  तर  आपल्याही बँकेला आपल्या पातळीवर सभासद हितासाठी हा निर्णय घ्यावा, असे सभासदांचे मगणाने आहे.  यावेळी बँकेचे किती हप्ते  सभासदांनी भरले  याचाही विचार सत्ताधारी मंडळाने घ्यावा.कारण सभासद हा बँकेचाआत्मा आहे.तसेच नियमित कर्जवसुली होत असल्याने व कमी NPA असल्याने चक्रवाढ व्याज घेऊ नये. याशिवाय  2019-20 आर्थिक वर्षात डिव्हिडंड 15 टक्के द्यावा. तसेच नवीन आर्थिक वर्षात सर्व कर्जाच्या प्रकाराला व्याजदर 9 टक्के करावा. सर्व सभासदांना मयत निधी 20 लाख रुपये करावा.व कर्ज माप करण्यात यावे. विद्यमान संचालक मंडळाने तातडीने कर्जावरील व्याजदर कमी करून सभासदांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment