Monday, March 30, 2020

तुकारामबाबा यांच्याकडून मास्कचे वाटप

जत,(प्रतिनिधी)-
चिकलगी मठाचे मठाधिपती , समाजसेवक तुकाराम बाबा महाराज  यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले. येळवी येथील ग्रामपंचायती पासून तुकाराम बाबा महाराज यांनी मास्कच्या वाटपास सुरुवात केली.

जतचे तहसिलदार सचिन पाटील, जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, जतचे डीवायएसपी दिलीप जगदाळे, उमदी पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, कर्नाटकातील इंडी येथील अधिकारी, पोलीस अधिकारी यांना भेटून तुकाराम बाबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले मास्क त्यांच्याकडे सुपूर्त केले.
कोरोनाची जनजागृती करणाऱ्या तालुक्यातील पत्रकार बांधवानाही तसेच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना बाबांनी मास्कचे वाटप केले.   रस्त्यावर उतरून लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांना तुकाराम बाबांनी मास्क तर वाटप केलेच पण त्याचबरोबर मठामध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
चिकलगी मठाचे मठाधिपती , समाजसेवक तुकाराम बाबा महाराज  यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले.

No comments:

Post a Comment