Friday, March 13, 2020

जत तालुक्यात मिनी आगार होण्यासाठी प्रयत्न करू : दिनकर पतंगे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात आणखी एक मिनी आगार होण्यासाठी प्रयत्न करू,असे प्रतिपादन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी जत येथे केले. काल जत येथील एसटी महामंडळला महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे व जत तालुक्यातील काही शिवसैनिकांनी भेट देऊन तेथील एसटी व कामगारांच्या विविध अडीअडचणी प्रश्नांची माहीती घेतली. जत आगारातून पूर्वीप्रमाणे शिर्डी, बेळगाव, बेंगळूर,पणजी व कुडनूर या गाड्या सुरू कराव्यात यासाठी जत आगारप्रमुख श्री. व्होनराव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आगार प्रमुख श्री. व्होनराव यांनी जत एसटीची विविध अडीअडचणीची माहिती दिली व जत सारख्या पूर्व भागात एक मिनी डेपो झाला पाहिजे, अशी मागणी केली.
यावेळी पतंगे यांनी असे सांगितले की मी लवकरच परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन जत तालुक्यातील शेगाव रस्त्याला असलेली एस टीच्या हक्काच्या जाग्यावरती डेपो झाला पाहिजे व पूर्व भागातील मिनी डेपो, जत आगाराला नवीन 10 गाड्यांची मागणी यासाठी परब यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार आहेत. या मागण्या  पूर्ण झाले तर जत सारख्या दुष्काळी तालुक्यात एसटीचे उत्पन्न दुप्पटीने वाढणार आहे. यावेळी निवेदन देताना पतंगे समवेत युवासेना सरचिटणीस जत शहर रोहित पाचंगे, म. का. सेना जत शहर प्रमुख आकाश भिसे, शाखा प्रमुख दिपक पाचंगे, शिवसैनिक पिंटू बल्लारी, प्रवासी हितचिंतक अशाराम चौगुले, राजू सावंत, अप्पासाहेब चौगुले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment