Wednesday, March 4, 2020

आईचा खून करणाऱ्या जतच्या युवकाला जन्मठेप

सांगली,(प्रतिनिधी)-
 किरकोळ कारणावरून आईचा विळ्याने वार करून खून करणाऱ्या किरण रायाप्पा बंडगे (वय २५, रा. बाज, ता. जत) किरण बंडगे या मुलास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंदाबाई रायाप्पा बंडगे मृत आईचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
जानेवारी २०१६ मध्ये बाज येथे ही घटना घडली होती. आरोपी किरणचे वडील रायाप्पा बंडगे हे पली. तीन मले व कुटुंबासह बाज येथे राहण्यास होते. रायाप्पा यांचा मोठा मुलगा शरद हार ऊसतोडीसाठी कवठेपिरान येथे गेला होता. दुसरा ट्रॅक्टरचालक म्हणून काम करीत होता, तर तिसरा मुलगा आरोपी किरण हा काहीही कामधंदा नसल्याने  घरातच होता. किरणचा स्वभाव भांडखोर असल्याने त्याचे कोणाशी पटत नव्हते. घटनेच्या दिवशी सायंकाळी पाचच्या वाजण्याच्या सुमारास किरणची आई नंदाबाई यांनी किरणला हातपाय पुसण्यावरून विचारणा केली. त्याचा राग आल्याने  रात्री साडेदहाच्या सुमारास घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर किरणने आई नंदाबाई यांच्यावर विळ्याने छातीवर, पाठीवर व मानेवर वार केले. हल्ल्याचा प्रकार सुरू असताना किरणची आजी वैजयंता जाग्या होऊन त्यांनी आरडाओरडा सरु केला. रायाप्पाही जागे झाले. त्यांनी किरणला तू हे काय केलेस, असे विचारले असता, म्हाताऱ्या तुला पण आता जिवंत सोडत नाही म्हणून त्यांच्या मानेवर विळ्याने वार केला व दुसरा वार करणार तोवर विळा निखळून पडला. ते ओरडतच घराबाहेर आले, तर किरणने आजी वैजयंता यांच्याही डोक्यात कुन्हाडीने घाव घातला होता. शेजाऱ्यांनी दोघांनाही जतच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रायाप्पा यांनी दिलेल्या जबाबानुसार खून व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे किरणवर दाखल करण्यात आले. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सोनवलकर यांनी गुन्ह्याचा तपास केला व आरोपपत्र दाखल केले.

No comments:

Post a Comment