Monday, March 30, 2020

डफळापूरला प्रयास फाऊंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथे प्रयास फौंडेशन आयोजित रक्तदान शिबीर येथे भरवण्यात आले होते. यावेळी तब्बल 39 जणांनी रक्तदान केले, कोरोना विषाणू संक्रमण काळात ही रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

कोरोनाच्या व्हायरस मुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रयास फौंडेशनने डफळापूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले. सत्यम ब्लड बँक (जत) यांनी सहकार्य केले. यावेळी सोशल डिस्टनसिंग पाळून रक्तदान करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब,परशुराम चव्हाण,उपसरपंच पापा चव्हाण, ग्रामसेवक,मंडळ अधिकारी उपस्थित होते,
संस्थेचे अध्यक्ष निहाल खतीब, मोहसीन नदाफ,अजीज शेख, विक्रांत उबाळे या संस्थेच्या सदस्यांनी  नियोजन केले. कोरोना व्हायरस संक्रमण काळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. इतर आजार असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज असून सामाजिक संस्थानीं पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित केली पाहिजेत, असे प्रतिपादन श्री. खतीब यांनी केले.

No comments:

Post a Comment