Saturday, March 7, 2020

मिरज शब्दांगणचे 'चैतन्य शब्दांगण' पुरस्कार जाहीर

शेगावच्या लवकुमार मुळेंचा समावेश
मिरज,(प्रतिनिधी)-
येथील शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ मिरज या संस्थेच्यावतीने साहित्य क्षेत्रातील विविध  साहित्यकृतीना देण्यात येणार्या पुरस्कारांची घोषणा  पुरस्कार निवड समितीने शनिवारी  जाहीर केली. स्व. प्रकाश कोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कथासंग्रहासासाठी देण्यारा येणारा पुरस्कार मुंबई येथील नारायण लाळे यांच्या काजवा कथासंग्रहाला तर स्व. अशोक कोरे यांच्या नावे देण्यात येणारा कादंबरीसाठीचा पुरस्कार जयसिंगपूर येथील डाॅ. सतीशकुमार पाटील यांच्या  मृत्यूस्पर्शला जाहीर करण्यात आला आहे. स्व.   चैतन्य माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा कवितासंग्रहासाठी कराडच्या अॅड. प्रमोद मोहिते यांच्या काळजापासून काळजापर्यंत या संग्रहास आणि स्व. विवेक माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार  माझ्या हयातीचा दाखला डाॅ. विशाल इंगोले (बुलढाणा) याना देण्यात आला आहे.
तसेच  चंद्रशेखर गावस-दोन थेंब आकाश (गोवा) जगजित महावंश- सूर्य गोंदला भाळी , कोल्हापूर,   कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे -लवकुमार मुळे, (जत) शब्दगंध अश्विनी कुलकर्णी (सांगली),  हे बंध वेदनेचे बबन धुमाळ (दौंड-पुणे),  गंध सोनचाफी गौतम कांबळे (सांगली), राहुल पाटील काव्यमध (मिरज) या कविता संग्रहाना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हे सर्व पुरस्कार येत्या १०मार्च रोजी होणार्या अपंग (दिव्यांग) सन्मान साहित्य संमेलनातील समारंभात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. एकूण अकरा साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
 १.नारायण लाळे, २.चंद्रशेखर गावस, ३.गौतम कांबळे ४.डाॅ.सतिश पाटील,५.विशाल इंगोले, ६.बबन धुमाळ ७.राहुल पाटील, ८.आश्विनी कुलकर्णी,९.लवकुमार मुळे,१०.प्रमोद मोहिते, ११.जगजित महावंश

No comments:

Post a Comment