Thursday, March 5, 2020

व्हसपेट येथे राहत्या झोपडीस आग; लाखाचे नुकसान

जत,(प्रतिनिधी)-
व्हसपेट (ता.जत) येथे  बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास   राहत्या झोपडीस वीजवाहक तारांचे  शाँर्टसर्किट होऊन आग लागली.  गुलाब कोंडीबा हुवाळे यांची ही झोपडी होती. दररोज कामाला जाउन हे  हुवाळे दांपत्य आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करतात. रोजच्या प्रमाणे  ते कामाला गेलेले असताना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किट होऊन आग लागली, व बघता बघता या आगीने एक शेळी व काही कोंबड्या सह सर्व  संसारोपयोगी साहित्य  यांचा कोळसा झाला.
यावेळी काही गावकरी धावत येऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण शेवटी यात शेळी व कोंबड्या जाळून खाक झाल्या.  संध्याकाळी उशिरा या घटनेचा पंचनामा झाला. या आगीत सदर कुटुंबाचे जवळपास नव्वद  हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment