Monday, March 2, 2020

'एलआयसी'च्या दोन नवीन योजना

जत,(प्रतिनिधी)-
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) दोन नवीन युनिटलिंक योजनांची घोषणा केली आहे. 'निवेश प्लस' आणि 'एलआयसीएसआयआयपी' अशा दोन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 'निवेश प्लस' ही सिंगल प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, युनिटलिंक्ड अशी वैयक्तिक आयुर्विमा योजना आहे. पॉलिसीच्या काळात व्यक्तीला विमा संरक्षणासोबत गुंतवणुकीचा पर्याय दिला जातो. विमा घेणारी व्यक्ती किती रक्कम भरावयाची, याबाबत निर्णय घेऊ शकते. पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला पॉलिसी घेतेवेळी मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम ठरविण्याचीही सुविधा आहे.
मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या रकमेचा पर्याय सिंगल प्रीमियमच्या १.२५ पट किंवा सिंगल प्रीमियमच्या १० पट आहे. पॉलिसी घेत विशिष्ट कालावधीनंतर सिंगल प्रीमियमच्या टक्केवारीच्या रूपात गॅरंटिड अॅडिशनची भरती युनिट फंडामध्ये केली जाईल. यासाठी किमान प्रीमियम एक लाख रुपये असून, कमाल मर्यादा कोणतीही नाही. 'एलआयसी एसआयआयपी'
ही रेग्युलर प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, युनिटलिंक्ड अशी वैयक्तिक आयुर्विमा योजना आहे. यामध्येदेखील पॉलिसीच्या काळात व्यक्तीला विमा संरक्षणासोबत गुंतवणुकीचा पर्याय मिळतो. किमान प्रीमियम ४० हजार रुपये (वर्षासाठी) आहे, तर जास्तीत जास्त प्रीमियमसाठी कोणतीही मर्यादा नाही. दोन्ही योजना ऑनलाइन तसेच ऑफलाइनही खरेदी करता येतील. आजपासून या योजना खरेदीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment