Sunday, March 8, 2020

जत शहरातील सोलनकर चौकातील अतिक्रमण हलविले

जत,प्रतिनिधी)-
 जत ते सांगोला या रस्त्याच्या कामाला गती आली असून काम जतजवळ आले आहे. हायवेच्या कामामुळे रस्त्याला अडथळा येणारी पानटपरी व खोकी आज हलविण्यात आली. याबरोबरच निवारा असलेले मोठे वृक्ष देखील पाडण्यात आले आहेत. जत शहरातील सोलनकर चौकात दोन मार्ग लागतात. एक विजापूर - गुहागर  व दुसरा सांगोला- ऐगळी. दोन्हीही मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. सांगोला - जत मार्गावरील जत शहराजवळचे काम राहिले होते. ते आता पूर्ण करण्यासाठी या  मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. अचकनहळ्ळी फाटा ते जत शहरातील सोलनकर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला गती आली आहे.सोलनकर चौकाच्या परिसरातील अतिक्रमणे हटवली जात आहेत.यामध्ये उन्हाळ्यात सावली देणारे अनेक मोठे वृक्ष रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात आले आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. मात्र विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्याचे काम सुरूच आहे. परंतु झाडे तोडण्याबरोबरच झाडे लावण्याचा उपक्रमदेखील ठेकेदारांनी करावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment