Monday, March 30, 2020

के.एम. हायस्कूलचे प्राचार्य सय्यद यांना आदर्श सेवा पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील के. एम. हायस्कूलचे प्राचार्य रियाज सय्यद यांना सीबीएस न्यूजच्यावतीने राज्यस्तरीय 'आदर्श सेवा पुरस्कार' नुकताच सांगोला (जि. सोलापूर) येथे प्रदान करण्यात आला. या अगोदर लातूरच्या संस्थेकडून ज्ञानरत्न पुरस्कार मिळाला होता. सांगोला येथील सीबीएस न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याहस्ते व आमदार दीपक (आबा) साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली रियाज सय्यद यांना आदर्श सेवा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती जतचे आमदार विक्रमदादा सावंत, सोलापूर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा शाहीन शेख,कॉंग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. पी. सी. झपके यांची प्रमुख उपस्थिती होती. सय्यद सरांना पुरस्कार मिळाल्याबद्दल जतमध्ये माजी नगराध्यक्ष इक्बाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते व मुस्लिम समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment