Monday, March 30, 2020

शेतकऱ्यांना पेट्रोल-डिझेल न देणाऱ्या पंपचालकांवर कारवाई करा

बसवराज पाटील                                              जत,
(प्रतिनिधी)-                                                           कोरोना प्रतिबंधित लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतीची कामे अडून राहिली असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने पेट्रोल -डिझेल देण्याचे आदेश देऊनही पेट्रोप पंप चालक तेल देत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

वास्तविक जिल्हा अधिकारी सांगली, उपविभागीय अधिकारी जत, तहसिलदार जत व गटविकास अधिकारी जत यांनी जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना अधिकृत आदेश काढून शेतकऱ्यांना पेट्रोल-डिझेल मिळण्यासाठी ग्रामपंचायतच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने पेट्रोल पंप चालाकांना शिफारस पत्र देऊन शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वाये ग्रामपंचायतीने पेट्रोल पंप चालकांना ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच व सचिव म्हणून तलाठी यांच्या सही शिक्क्याने शेतकऱ्यांना पेट्रोल किंवा डिझेल मिळण्यासाठी असा दाखला देण्यात देतो. मात्र तरीही पंपचालक पेट्रोल-डिझेल देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत तरी शेतकऱ्यांना पेट्रोल-डिझेल नाकारणाऱ्या पेट्रोल पंपधारकावर कारवाई करण्याची मागणी सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment