Sunday, March 29, 2020

उमदीत निर्जंतुकीकरण फवारणी

उमदी,( वार्ताहर)-
 कोरोणा विषाणुचा वाढता धोका लक्षात घेऊन उमदी ता.जत येथील सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी उमदी ग्रामपंचायतीने सतर्कतेची पावले उचलली आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. तसेच सर्व दुकानदारास नोटीसा देत वेळेचे बधंन पाळा , शासनास सहकार्य करा अशा आशयाची नोटीस देखील काढली आहे.

         गावातील गर्दीच्या ठिकाणी तसेच शिवाजी चौक, गांधी चौक, ग्रामपंचायत परिसर, मलकारसिद्ध मंदिर परिसर, आंबेडकर नगर, इंदिरानगर, लहान उमदी आदी ठिकाणी  ट्रॅक्‍टरच्या साह्याने फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे यांनी पुणे मुंबई येथून व बाहेरून आलेले लोकांनी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपले नाव नोंदवून तपासणी करून घ्यावे व बाहेर फिरु नये असे आव्हान केले आहे .

No comments:

Post a Comment