Tuesday, March 3, 2020

ऊसतोड मजुराची आत्महत्या

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील करेवाडी  येथील ऊसतोड मजूराने सोमवारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली.तुकाराम नामदेव करे (वय 25,रा.करेवाडी को.बो)असे आत्महत्या केलेल्या ऊस तोड कामगाराचे नाव आहे.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मुळ करेवाडी (कोंते बोबलाद)येथील ऊसतोड कामगार तुकाराम करे हा कुंटुबियासह सध्या डोंगराई परिसरात ऊसतोडीचे काम करत आहे.
सोमवारी तो आंसगीतुर्क येथील आजोबा लक्ष्मण रामा शिंगाडे यांच्याकडे मुक्कामास आला होता.सोमवारी सर्वजण जेवन करून झोपी गेले होते.मध्यरात्री तुकाराम याने घराजवळच्या आंब्याच्या झाडाला ओढणीने गळपास लावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार समोर आला. पोलीसांनी घटनास्थळांचा पंचनामा केला आहे.

No comments:

Post a Comment