Thursday, April 30, 2020

शिधापत्रिकाधारकांना धान्याबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा

श्रीशैल बिराजदार
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथीच्या आजाराला रोखण्यासाठी  सध्या लॉकडाऊन केले आहे. यात 'हातावर आणून पानावर खाणा-यांचे' अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत,म्हणून मदत केली जात आहे. परंतु  याचबरोबर गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तुचेही वाटप करण्यात यावे, अशी मागणी उमदी परिसरातील  सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लॉकडाऊन’ कालावधीत ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त

कोरोनाबाबत डीवायपाटील फार्मसी महाविद्यालयाने केले सर्वेक्षण
पिंपरी : आरोग्य सेवांमध्ये दर्जात्मक सुधारणा गरजेची, २० टक्के जनता कोरोना बाबतीत अनभिज्ञ, ७० टक्के नागरीक चिंताग्रस्त असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाने ’लॉकडाऊन’मध्ये केलेल्या राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन सर्वेक्षणातून निदर्शनास आले.

उमदीत गूळ खरेदी-विक्रीवर बंदी: उमदी पोलीस

किराणा दुकानातून विक्री होत राहिल्यास  कारवाई 
माडग्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 उमदीत हातभट्टी दारू बनविण्यासाठी गुळाचा वापर केला जात असल्याने उमदी पोलिसांनी गूळ खरेदी-विक्री वर बंदी घालण्यात आली आहे.  उमदी येथील किराणा दुकानदार केवळ   नफा  न  पाहता कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर आपल्या व  ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे असताना कांहीं दुकानदारांनी    गुळ  स्टॉक करून  हातभट्टी दारू तयार करण्याऱ्या कांही जमातींना देत आहेत. सध्या सरकारी दारू दुकाने बंद असल्याने गावातील कांही लोक हातभट्टीकडे वळले आहेत  त्यातच  कर्नाटक राज्यातील चडचण, देवरनिंबर्गी, हिंचगिरी, निवर्गी आदी भागातील लोक दारू पिण्यास उमदीत येत आहेत.

Tuesday, April 28, 2020

कोरोना संकट काळात काम करणाऱ्या सरपंचांना पोलिस संरक्षण द्या

बसवराज पाटील
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 कोरोना या जीवघेण्या संकटात ज्याप्रमाणे डॉक्टर, पोलिस यांची भुमिका महत्वाची आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात या संकटाचा सामना गावचे सरपंच हे करीत आहेत. त्यांची कामगिरी आणि संवेदनशील भूमिका नजरेआड करून चालणार नाही. तेव्हा राज्य सरकारने ग्राम स्तरावर काम करणाऱ्या सरपंचांना पोलिस संरक्षण मिळवून द्यावे,अशी मागणी जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

Monday, April 27, 2020

देश मोठय़ा नैसर्गिक संकटात सापडणार

जळगाव,(प्रतिनिधी)-
यावर्षी देश मोठय़ा नैसर्गिक संकटात सापडणार आहे. भरपूर पाऊस राहणार असून पीक परिस्थिती साधारण राहील तर अतीवृष्टी भरपूर होईल. देशाचा राजा कायम राहणार असून त्याच्यावर प्रचंड ताण असेल. संरक्षण व्यवस्था मजबूत असली तरी शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. त्यामुळे संघटित होऊन देशावर येणार्‍या संकटाशी लढा करावा लागेल, असे भाकीत भेंडवळ येथील घटमांडणीत वर्तविण्यात आले आहे.

Saturday, April 25, 2020

जतमध्ये 'जनता कर्फ्यू' चे उल्लंघन; तिघांवर गुन्हा

जत,(प्रतिनिधी)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचार बंदी आहे.त्यातच गेले चार दिवस नगरपालिकेच्यावतीने 'जनता कर्फ्यू' लावताना संचार बंदीची कडक अंमलबजावणी केली जात असताना जतमधील काही दुकानदारांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. याबाबतीत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

जतच्या सीमेवर असलेल्या घेरडीमध्ये कोरोना रुग्ण आढळला

सोलापुरात रुग्णांची संख्या झाली 50;सीमाभाग सील
फाईल फोटो
सोलापूर,(जत न्यूज वृत्तसेवा)-
इतके दिवस केवळ सोलापूर शहरात धुमाकूळ घालणारा 'कोरोना' आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही घुसला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून जिल्ह्यात  आज दिवसभर नवीन नऊ रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी शनिवारी सायंकाळी दिली. अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या एकूण 50 झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शाळा बंद, पण अध्ययन सुरू!

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा पुढाकार
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती पाहता शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरू झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासमाला सुरू आहे.  शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि सराव सुरू आहे.

जत फ्रेंडस सर्कलच्यावतीने अन्नधान्य व भाजीपाला वाटप

जत,( जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील जत फ्रेंडस सर्कलच्यावतीने अध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जत येथील प्रभाग आठमध्ये गरजू व गोरगरीब जनतेला अन्नधान्य व भाजीपाला वाटप करण्यात आला. कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये गरीब व हातावर काम करून पोट भरणाऱ्या लोकांची उपासमार होऊ नये, म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला.

Friday, April 24, 2020

आवंढी येथील रेशन दुकान गैर व्यवहारप्रकरणी सील

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील आवंढी  येथील सुमन विलास पाटील यांच्या नावावर असलेल्या  एकमेव रेशन दुकानाबाबत तक्रारी वाढल्याने आवंढी ग्रामस्थांनी सरळ जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन जत प्रशासनाने दुकान सील केले.

स्वरा संग्रामे हिचे मंथन परीक्षेत यश

तासगाव,(जत न्यूज वृत्तसेवा)-
मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२० ची राज्य गुणवत्ता यादी मंथनच्या वेबसाईटवर नुकतीच  प्रसिद्ध झाली आहे. ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रावरुन घेण्यात आली होती. सावळज शाळा नं.२ ने या वर्षी सुध्दा गुणवत्तेची परंपरा कायम ठेवलेली आहे तासगाव तालुक्यातील सावळज शाळा नं.२ जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीत शिकणारी कु. स्वरा सुधाकर संग्रामे हिने १५० पैकी १४० गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ६ वे स्थान पटकावले आहे.

Thursday, April 23, 2020

अजिंक्यतारा प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधीस मदत

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्यावतीने नुकताच ११ हजारांचा आर्थिक मदतीचा धनादेश प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिष  येरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यात होणाऱ्या बदल्या रद्द करा

शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषदेसह इतर राज्य शासनाच्या अखत्यारित येणार्‍या विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या माहे मे महिन्यात करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शासन व यंत्रणा अत्यंत व्यस्त असल्यामुळे यावर्षी मे महिन्यात होणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा ५00 कोटींचा खर्च कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर वळता करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडे करण्यात आली आहे.

तीन महिन्यांपर्यंतची विद्युत देयके माफ करण्याची करा

कामगार सेनेचे दिनकर पतंगे यांचे उर्जामंत्र्यांना निवेदन
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्यातील जनतेला दिलासा देणारे जनतेच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निणय महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने घेतले आहेत. यात ऊर्जा खात्यांतर्गत लॉकडाऊन कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार पुढील तीन महिन्यासाठी स्थगित करून राज्यातील नागरिकांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Wednesday, April 22, 2020

मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील विदारक वास्तव

दहा बाय दहाची खोली, अकरा लोक आणि शिफ्टमध्ये झोप

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाने शिरकाव करून हाहाकार माजवला आहे. धारावीत आतापयर्ंत १८0 जणांना कोरोनाची लागण झाली असून १२ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील डोकेदुखी वाढली आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण एकट्या धारावीतील आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने धारावीतील वास्तवही पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. दहा बाय दहाच्या खोलीत दहा अकरा लोक राहत असून अनेकजण शिफ्टमध्ये झोप घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जत शहर 100 टक्के लॉकडाऊन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहराच्या चारी बाजूनी कोरोना विषाणुचे वादळ घोघावत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी जत शहरात आज बुधवारपासून पुढील चार दिवस 100 टक्के लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्याला पहिल्याच दिवशी जतकरांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला. त्यामुळे रस्त्यावर  चिटपाखरूही दिसत नव्हते.

आज दिवसभरात 531 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

18 जणांचा मृत्यू; 65 रुग्ण बरे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. आज दिवसभरात 531 रुग्णांची वाढ झाली आहे.  त्यामुळे आतापर्यंत राज्यात 5 हजार 649 रुग्ण संख्या झाली आहे.  तर देशात हा आकडा 20 हजार 471 झाली आहे. देशभरात कोरोनाचा आणखी  धोका वाढला आहे.

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्या

आमदार विक्रम सावंत
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या पंप हाऊस सुरू करून देवनाळ व बिळूर कालव्याव्दारे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली.  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत येणारे सर्व तलाव भरून घ्या, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

उमदीत कुटुंबांना व शासकीय कर्मचाऱ्यांना पतसंस्थेतर्फे मास्क वाटप

उमदी,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील उमदी येथे बिगर शेती सहकारी पतसंस्थेवतीने गावातील व वाड्यावस्तावरील सर्व कुटुंब तसेच सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांना संस्थेचे अध्यक्ष विष्णू निळे, उपाध्यक्ष महादेव होर्तीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, अँड. चन्नाप्पा होर्तीकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप करत जनजागृती केली.

चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
तयार कंपन्यांच्या चप्पल बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला असताना  चर्मकार समाज आपला पारंपारिक व्यवसाय कसा बसा टिकवून ठेवत व्यवसाय करीत आहेत. मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी हराळे समाजाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे यांनी केली आहे.

Tuesday, April 21, 2020

चीनचा भारतात पाय पसरण्याचा प्रयत्न

चीनच्या केंद्रीय बँकेने जेव्हा एचडीएफसीमध्ये आपला समभाग वाढवून १.०१ टक्के केला तेव्हा केंद्र सरकार खडबडून जागे झाले. चीनने भारतात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. पण कोरोनामुळे भारतीय उद्योग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. चीनने याच परिस्थितीचा फायदा घेऊन संधिसाधू गुंतवणूक करू नये यासाठी भारताने थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमात बदल केले.

लॉकडाऊनमध्ये वाढली चाइल्ड पोर्नोग्राफी


(जत न्यूज वृत्तसेवा)
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात चाइल्ड पोर्नोग्राफी पाहण्याच्या  घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र पोलिसात चाइल्ड पोर्नोग्राफीचा ऑनलाइन शोध आणि आशयाचा प्रसार यासंबंधी १३३ गुन्हे दाखल आहेत. तसेच ४६ लोकांना अटक केली आहे. आपल्या राज्यासाठी ही अत्यंत लाजीवरवाणी बाब आहे.

Monday, April 20, 2020

विजयपुरात एका दिवसात अकरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले

रुग्णांची संख्या झाली 32; प्रशासन आणखी अलर्ट
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
विजयापुरात सोमवारी (ता.20) एका दिवसांत तब्बल अकरा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 32 झाली आहे.दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सायंकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सात वर्षांची मुलगी, दहा आणि चौदा वर्षांची दोन मुले,28 आणि 36 वर्षांचे दोन युवक, 21 युवती, 27, 34, 38  आणि 47 वर्षांच्या चार महिलांचा समावेश आहे.

सोलापूर डेंजर झोनमध्ये : कोरोना बाधितांची संख्या २१

शहरात आणखी ६ पॉझिटिव्ह रुग्ण
सोलापूर ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आता ही संख्या २१ झाली आहे. आज सोमवारी मिळालेले ६ रूग्णापैकी बापूजीनगर,अयोध्या नगरी येथील प्रत्येकी १ तर कुर्बानहुसेन नगर आणि पाच्छा पेठ येथील प्रत्येकी २ रूग्ण आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. हे सर्व भाग पोलीसांनी बंदिस्त केले आहेत. या भागात पोलीसांची गस्त वाढविली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे बजावण्यात आले आहे.

इफको संस्थेतर्फे सोन्याळमध्ये सुरक्षा किटचे वाटप

( इफको कंपनीकडून सोन्याळ ता जत येथे गरीब गरजू लोकांना जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी-पाटील यांच्याहस्ते  सुरक्षा  किटचे वाटप करण्यात आले.)
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जगातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या ईफकोद्वारे  'ईफको का है नारा, कोरोना को है हराना' ह्या उद्धिष्टाला उराशी बाळगून ईफको संस्था कोरोना संसर्ग प्रादुर्भाव निर्मूलन अंतर्गत  जत तालुक्यातील सोन्याळ परिसरातील ग्रामस्थ, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डॉक्टर, पत्रकार, बँक कर्मचारी, एम एस ई बी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, दुकानदार, ग्रामपंचायत सदस्य, शिपाई, वॉटरमॅन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना  ५०० मास्क,५०० साबण  व २०० व्हिटॅमिन 'C' च्या गोळ्या  जि.प. माजी आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

पहिली ते आठवीच्या मूल्यमापनाबाबत शिक्षक,पालकांमध्ये संभ्रम

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत . मात्र , या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे की नाही किंवा निकाल  तयार न करताच या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यायचा आहे  का, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . हा संभ्रम मिटवून मूल्यमापन , निकाल की थेट प्रवेश याबाबत मार्गदर्शन करण्याचा  योग्य आदेश मिळावा , अशी मागणी विविध शिक्षकांच्या संघटनांनी  शिक्षण संचालक व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे .

Sunday, April 19, 2020

सांगलीमध्ये कोरोनाचा पहिला बळी;जिल्हा हादरला

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्हा कोरोना संसर्गाच्या मुक्तीच्या दिशेने निघाला असताना एका सहकारी बँकेत कर्मचारी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सांगली शहरासह जिल्हाच हादरून गेला आहे. ही व्यक्ती सांगलीतील विजयनगरमधील आहे.  धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने गेल्या महिन्याभरात परदेश वारी किंवा इतर राज्यातही गेली नसल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला बँकेच्या माध्यमातून संसर्ग झाला आहे का याचा तपास केला जात आहे.

प्रकाश जमदाडे यांचेतर्फे मास्क व सॅनिटीझर वाटप

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील निगडी, काराजनगी, घोलेश्वर, सनमडी, कुनीकोनूर, टोणेवाडी आणि खैराव या गावामध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी गरजू लोकांना मास्क व सॅनिटीझर वाटप केले.

जत तालुक्यात 'लॉकडाऊन' ची कडक अंमलबजावणी करा

संजय कांबळे
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सोलापूर जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यातील विजयपूर व बेळगाव या जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोट्या प्रमाणात आढळल्याने कोरोना ही महामारी जत तालुक्यात शिरकाव करू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जत तालुक्यात कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.

रेशन कार्ड नसणाऱ्यांना मोफत धान्य द्यावे


श्रीशैल बिराजदार
जत ( जत न्यूज वृत्तसेवा)-
ज्या कुटुंबियांकडे अद्यापही शिधापत्रिका नाहीत. अशा कुटुंबियांना शासनाच्यावतीने स्वस्त धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जत तालुक्यातीलउमदी खालील विठ्ठलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांनी केली आहे. तालूक्यातील प्रत्येक गावागावात अनेकांजवळ शिधापत्रिका नसुन ते स्वस्त धान्यापासुन वंचित
राहात आहेत. कोरोना संकटांने देशालाच नव्हेतर जगाला वेठीस धरले आहे. तेंव्हा जनजीवन पुर्णपणे विस्कटुन गेले आहे.

ठिबकसिंचन व पाईपलाईन साहित्याची दुकाने सुरू;शेतकाऱ्याना दिलासा

( जत तालुक्यातील संख येथे सोशल डिस्टन्सिंग पाळत शेतकऱयांनी अशाप्रकारे शेतीविषयक साहित्याची खरेदी करत आहे.)
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे,यंत्राची सुट्टे भाग व ठिबक आणि पाईपलाईनच्या साहित्य विक्रीवर बंदी घालण्याचे आले होते. या साहित्या अभावी शेतकऱयांची कामे खोळंबली होती.दुसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये  ही बंदी उठवण्यात आल्याने शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. संख आणि परिसरात ठिबक आणि पाईपलाईन साहित्याची दुकाने चालू झाली आहेत. ठिबक साहित्य खरेदीसाठी शेतकऱयांची गर्दी वाढू लागली आहे.

वॉर्डनुसार कोरोना आरोग्य तपासणी करा

आबासाहेब ऐवळे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
राज्यात आणि देशात महिनाभर लॉक डाऊन करूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व स्तरावर ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील  प्रत्येक वॉर्डनुसार कोरोना आरोग्य तपासणी मोफत करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे (ऐवळे गट)   संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी केली आहे.

Saturday, April 18, 2020

सांगली शहरात कोरोनाचा शिरकाव;बँक कर्मचाऱ्याला बाधा

सांगली शहर कडक निगरणीत
सांगली,(प्रतिनिधी)-
सांगली कोरोना संसर्गातून बाहेर येत असतानाच सांगली शहरातील एका इसमाला  कोरोना संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. कोरोनाने आता सांगली शहरात शिरकाव केला आहे.  संक्रमित व्यक्ती ही एका बॅंकेतील कर्मचारी आहे. या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटूंबातील ५ जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात 21 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांनी समाधानाचा सुस्कारा टाकला होता,मात्र आता शहरातच रुग्ण आढळल्याने यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. शहरातील मुख्य भाग कडक स्वरूपात लॉक डाऊन करण्यात आले आहेत.

सोन्याळ येथे कोरोनाविषयी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण

(व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण घेताना पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग)
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-         
जत तालुक्यातील सोन्याळ येथे संरपच, उपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर्स,  इतर कर्मचाऱ्यांना कोविड १९ विषाणू संदर्भात ऑनलाइन प्रशिक्षण (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) देण्यात आले.सांगली जिल्हा परिषद येथून या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
सरपंच सौ संगीता निवर्गी,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सोन्याळ येथील श्री विजय विठ्ठल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रशिक्षणासाठी  व्यवस्था करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना काय ? क्वारंटाइन आणि आयसोलेशन याच्यात काय फरक आहे ? गरम पाण्यात विषाणू मरतो का? कोणत्या रूग्णांना या आजाराचा जास्त धोका संभवतो? आदी विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ निवर्गी,उपसरपंच सुमन कांबळे,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार, जक्कु निवर्गी, तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार, विजयकुमार बगली, काडसिद्द काराजनगी,दयानंद मुचंडी, अभिजित कांबळे, आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक व केंद्रचालक हे उपस्थित होते.प्रशिक्षण पार पाडण्यासाठी हायस्कूलचे जकप्पा बिरादार, रामणा मुचंडी, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक ऐवळे, डाटा ऑपरेटर सौ कविता सनोळे, अमृत सनोळे, बिराप्पा पुजारी,भीमणणा पुजारी यांनी परिश्रम घेतले.

कारवाईच्या भीतीने व्हाट्सएप ग्रुप 'लॉकडाऊन'

ग्रुप अॅडमीनची सावधगिरीची भूमिका
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
आजच्या संगणकीय युगात व्हॉट्सोंप हे माहीती आदान प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम आहे. परंतु कोरोना विषाणु जन्य आजाराच्या संकटामध्ये आक्षेपार्ह मजकूर,  चुकीची माहिती, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे संदेश पाठविणा-या नागरिकांच्या विरोधात शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बहुतांश ग्रुप अँडमीन यांनी केवळ आपलीच पोस्ट पाठविता येईल अशी भ्रमणध्वनी मध्ये सेटिंग करून बदल केला आहे.

बाळू कट्टीमनी यांची 'सर फाउंडेशन'च्या सांगली जिल्हा समन्वयकपदी निवड

सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर
फाउंडेशन) महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा समन्वयकपदी जत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमराणी जिल्हा परिषद  शाळेचे  उपक्रमशील, विषय शिक्षक धरेप्पा उर्फ बाळू कट्टीमनी यांची नुकतीच निवड करण्यात आली.त्याबद्दल त्यांचे जत तालुक्यातुन  अभिनंदन होत आहे.

Friday, April 17, 2020

माडग्याळमध्ये पाच दिवस लॉकडाऊन

माडग्याळ ,(जत न्यूज  वृत्तसेवा)-
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जत तालुक्यातील माडग्याळ येथे सलग पाच दिवसांसाठी पूर्णत : लॉकडाऊन करण्यात आले आहे . जत तालुक्यात उमदी, जाडर बोबलाद यांसह अनेक गावांनी स्वतःला लॉक करून घेतले आहे. सोलापूर व कर्नाटकातील विजापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत . त्यामुळे दक्षता  म्हणून माडग्याळचे  सरपंच इराण्णा जत्ती , ग्रामसेवक अशोक चव्हाण , उपसरपंच आबांना माळी व सर्व सदस्य यांनी गावातील व्यापारी , ज्येष्ठ नागरिक यांच्याशी सल्ला व चर्चा करून माडग्याळमध्ये मंगळवारपर्यंत  पाच दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऊसतोड मजूर जाणार आता आपापल्या गावाला

(फाइल फोटो)
मुंबई,(जत न्यूज वृत्तसेवा)-
ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करून त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबतचा शासन निर्णयाचे जारी करण्यात आला आहे.

सोन्याळ ग्रामपंचायततर्फे सॅनिटायझर,मास्क व प्रोत्साहन भत्ता वाटप

(ग्रामपंचायत सोन्याळतर्फे  सरपंच व उपसरपंच यांच्याहस्ते मोफत सॅनिटाईजर,मास्क व आशा वर्कर्सना प्रोत्साहन भत्ता वाटण्यात आले. )
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)
कोरोनाच्या साथीमध्ये खेडोपाडी आरोग्यसेविका आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस घरोघरी जात सर्वेक्षण करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सोन्याळ  ग्रामपंचायततर्फे सरपंच सौ संगीता निवर्गी,उपसरपंच सौ सुमन कांबळे व ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार यांच्याहस्ते मोफत हँड सॅनिटायजर, मास्क व प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन म्हणून मानधन वाटप करण्यात आले.

गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

बसवराज पाटील यांची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पश्चिम व दक्षिण भागात आज अवकाळी पावसाने आणि गारपिटाने शेती आणि बागांचे मोठे नुकसान झाले आहे.  या अवकाळी पाऊस आणि गारपीटाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.
बसवराज पाटील यांनी तहसिलदार सचिन पाटील यांना आज या भागात झालेल्या गारपीटीची ताबडतोब माहिती देऊन त्यांच्याशी चर्चा केली व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

गरीब व हातावर पोट असलेल्या लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार

चन्नाप्पा होर्तीकर
(गरीब लोकांच्या मदतीसाठी जि. प. माजी सदस्य चन्नाप्पा होर्तीकर यांनी जीवनावश्यक वस्तूंचे100 किट तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.) 
जत,(प्रतिनिधी)-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य तथा माजी जि.प.सदस्य चन्नाप्पा होर्तीकर व  सिध्दू शिरसाड यांनी पुढाकार घेत तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचे शंभर कीट सुपूर्द केले. त्यांच्या या उपक्रमाचे तहसीलदारांनीही कौतुक करत आभार व्यक्त केले.

Thursday, April 16, 2020

पुरबाधीत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफीसाठी 131 कोटी रुपये प्राप्त

 पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सांगली, (प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या  शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जस माफी जाहीर करण्यात आली होती.यासाठी आतापर्यंत  जिल्ह्याला 131 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे . यातील 80 कोटी रुपयांचा निधी  फेब्रुवारी 2020 मध्ये प्राप्त झाला असून आता 15एप्रिल 2020 रोजी उर्वरित 50 लाख 91 हजाराचा निधी पीक कर्ज माफीसाठी प्राप्त झाला आहे.

सोलापुरात एकाच दिवशी दहा कोरोनाबाधित आढळले

नर्समुळे नऊ जणांना लागण
सोलापूर,(प्रतिनिधी)-
सोलापुरात गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे दहा रुग्ण आढळले आहेत. ४२ संशयित रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असता त्यात दहा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. तर अन्य ३२ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
गेल्या रविवारी तेलंगी पाच्छा पेठ या दाट लोकवस्तीच्या भागातील बसवण्णा चौक परिसरातील एका मृत व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.

मनरेगातर्फे ग्रामीण रोजगाराचा दिलासा

राज्यात ३५ हजार कामांना मिळाली मंजुरी 
जलसंधारण व सिंचनाच्या कामांना प्राधान्य
(फाइल फोटो)
मुंबई,(प्रतिनिधी)-
कोरोना प्रतिबंधासाठी सध्या संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची उपाययोजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर हातावर पोट असणार्‍या या घटकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारा हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.

बेळगाव जिल्ह्यात एका दिवसांत17 रुग्ण

अथणी,(प्रतिनिधी)-
 केंद्र सरकारने बेळगाव जिल्ह्याला हॉटस्पॉट आणि राज्य सरकारने रेड झोनमध्ये समाविष्ट केल्याच्या काही तासांतच कोरोनाचा कहर झाला आहे . जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 36 वर पोहोचली असून , संपूर्ण जिल्ह्यावर भीतीचे सावट गडद झाले आहे . गुरुवारी सापडलेल्या 17 रुग्णांपैकी एक रुग्ण मूळ गोव्याचा , एक मिरजेचा तर आणि एकटा विजापूरचा रहिवाशी आहे .

उमदीत 20 पर्यंत कडकडीत 'लॉकडाऊन'

विजापूर, सोलापूरला कोरोना रुग्ण आढळल्याचा परिणाम
उमदी,(वार्ताहर)-
 कोरोणाच्या पार्श्वभूमीवर उमदी ता.जत येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मिळुन सलग पाच दिवस पुर्णत: दवाखाने व मेडीकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून लाँकडावुन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पहीला दिवस पुर्ण गाव बंद ठेवून लोकांनी प्रतिसाद दिला. तसेच बंद कालावधीत गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात आली.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार २०२

देशातील  कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 759
मुंबई,(प्रतिनिधी)-
दिलासादायक बातमी म्हणजे राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. तर ३०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात अजून सहा ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा निर्माण होणार असल्याने राज्यातील प्रयोगशाळांची संख्या ३६ होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. 

दोन चिमुरड्या मुलांसह विवाहितेची आत्महत्या

जत तालुक्यातील नवाळवाडी येथील घटना
जत,(प्रतिनिधी)-
माहेरी कर्नाटकातील विजयपूर येथे जाण्यासाठी सोडत नसल्याचा राग मनात धरून नवाळवाडी (ता.जत) येथील विवाहितेने दोन मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक आणि खळबळजनक घटना आज गुरूवारी दुपारी उघडकीस आली.

वाढदिवसाचा खर्च कोरोनासाठी

 बनाळीच्या सई सावंतची मुख्यमंत्री निधीस मदत
जत,(प्रतिनिधी)-
बनाळी येथील माजी जिल्हापरिषद सदस्य व शिवसेनेचे युवक नेते संजीवकुमार सावंत यांची इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारी कन्या सई हिचा  काल गुरुवारी वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाच्या खर्चाला सावंत कुटुंबीयांनी फाटा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत वाढदिवसानिमित्त रुपये दहा हजार दहा रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला.

Wednesday, April 15, 2020

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी

(फाइल फोटो)
सांगली,(प्रतिनिधी)-
' कोरोना ' च्या पार्श्वभूमीवर ' लॉकडाऊन ' मुळेमोकाट कुत्री भुकेली आहेत . ती हिंस्त्र बनली आहेत . अनेक ठिकाणी कुत्र्यांकडून दुचाकी , सायकलस्वाराचा पाठलाग केला जात आहे . नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत . आज हिराबाग कॉर्नरजवळ पिसाळलेल्या कुत्र्याने साद जब्बार नदाफ ( वय ७ ) या बालकाचा चावा घेतला . ओठाजवळ मोठा चावा घेतल्यामुळे साद गंभीर जखमी झाला .