Wednesday, April 22, 2020

जत शहर 100 टक्के लॉकडाऊन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहराच्या चारी बाजूनी कोरोना विषाणुचे वादळ घोघावत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी जत शहरात आज बुधवारपासून पुढील चार दिवस 100 टक्के लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्याला पहिल्याच दिवशी जतकरांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला. त्यामुळे रस्त्यावर  चिटपाखरूही दिसत नव्हते.

 जत तालुक्याच्या लगतच्या कर्नाटकातील विजापूर, बेळगांव,सोलापूर,सांगली कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढत असल्याने जत शहरासह तालुक्याला  मोठा धोका निर्माण झाला आहे. कोरोना विषाणु संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आजपासून चार दिवस शहरात  कडकडीत लॉकडाऊन सुरू झाला आहे.आज पहिल्या दिवशी प्रशासनातील अधिकारी,पोलीस वगळता रस्ते,गल्ली-बोळही लॉकडाऊन होती. जीवनावश्यक वस्तूंची दुकानेहि बंद करण्यात आली होती. दूध व भाजीपाला घरपोच करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. पेट्रोलपंपही पहाटे 5 ते  सकाळी 9 यावेळेत सुरू होते. त्यानंतर दिवसभर पेट्रोल पंप बंद होते. अत्यावश्यक दवाखाने व मेडिकल दुकाने यातून वगळण्यात आली होती. या लॉक डाऊनला जत शहारावासीयांनी शंभर टक्के प्रतिसाद देत घरातच राहण्याचा निर्णय घेतला. आणखी तीन कडक दिवस लॉकडाऊन  राबवण्यात येणार आहे.
विजापूरमध्ये 32 च्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाब, सोलापुरातही संख्या वाढू लागली असताना सांगलीतही रुग्ण आढळून आल्याने जत तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले  आहे. तालुक्यात उमदी, संख, माडग्याळ, जाडर बोबलाद  आदी मोठ्या गावांनी तीन -तीन दिवस कडक लॉकडाऊन करून घेतले. आजपासून जत शहरातहीचार दिवस  लॉक डाऊन  करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment