Thursday, April 2, 2020

जत तालुक्यातील आरोग्य विभागाची 103 पदे रिक्त

पदे भरण्यासाठी आमदार सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात 103 पदे रिक्त आहेत.तातडीने वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी जतचे आमदार विक्रम सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सध्या देशभर कोरोना (कोव्हीड १९)या संसर्गजन्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून जत तालुक्यामध्ये 2 ग्रामीण रुग्णालय व 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत .सध्या याठिकाणी डॉक्टर व आरोग्यसेवक यांची पदे रिक्त असल्याने सेवा विस्कळीत झाली आहे.
 सध्या कोरोना व्हायरसने देशभरात व महाराष्ट्रातथैमान घातला आहे. त्यातच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जत तालुक्यातील बहुतांशी उसतोड कामगार इस्लामपूर, कडेगाव, सांगली, वाळवा, कुंडल व अन्य कारखान्यास उसतोडीसाठी गेलेले आहेत. ते कोरोनाच्या भीतीने परत जत तालुक्यात आले असून त्यांची तपासणी करण्यासाठी व उपचार करण्यासाठी डॉक्टरांची व आरोग्य सेवकांची संख्या अगदी तुटपुंजी असून कोरोनाचा पुढील धोका टाळण्यासाठी जत तालुक्याला खास बाब म्हणून डॉक्टर व रुग्णसेवक तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे.
ग्रामीण रुग्णालय माडग्याळ हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून या ठिकाणी 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय असून त्याठिकाणी एकूण मंजूर 25 पदे असून त्यापैकी 15 पदे भरलेली असून 10 पदे रिक्त आहेत. त्यापैकी वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 व वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 चे 3,क्ष किरण तंत्रज्ञ 1, कनिष्ठ लिपिक),
शिपाई 1,कक्ष सेवक 2,व सफाईगार 2 असे एकूण 10 पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय जत याठिकाणी ठिकाणी 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय असून त्याठिकाणी एकूण मंजूर 25 पदे असून त्यापैकी 17 पदे भरलेली असून 9 पदे रिक्त आहेत त्यापैकी वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 व वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 चे 2,अधिपरिचारिका 1, सहायक अधीक्षक 1,प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, कक्ष सेवक 1, सफाईगार २ असे एकूण 9 पदे रिक्त आहेत. तालुक्यात एकूण 8 उपकेंद्रे असून त्यामध्ये मंजूर पदे 247 असून त्यापैकी वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 ची 11 पदे रिक्त आहेत.व इतर आरोग्य कर्मचारी 92असे एकूण 103 पदे रिक्त आहेत. तरी विस्ताराने जत तालुक्याचा सहानुभूतीने विचार करून तातडीने डॉक्टर व आरोग्य सेवक यांची रिक्त पदे त्वरीत उपलब्ध करून द्यावेत, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment