Tuesday, April 14, 2020

जतमधील एका व्यक्तीकडून 11 लाख रुपये जप्त

मिरज पोलिसांनी केली कारवाई
मिरज ,(प्रतिनिधी)-
मिरज शहरातील महात्मा गांधी चौक परिसरात पोलिसांनी आज  मंगळवारी 11 लाख 38 हजारांची रोकड एका व्यक्तीकडून जप्त केली . महालिंग रामगोंडा बिरादार ( वळसंग रोड , जत ) असे त्यांचे नाव आहे . मिरजेत संचारबंदीच्या काळात नाकेबंदीच्या वेळी वाहनांची तपासणी करताना ही रोकड पोलिसांना मिळून आली.  जतमधील महालिंग बिरादारकडे 11 लाख 38 हजार रुपये मिळाले ; परंतु त्यापैकी 38 हजार रुपये शहरातील एका खासगी रुग्णालयात भरायचे होते .
तेवढी रक्कम पोलिसांनी त्यांना परत दिली , याबाबत पोलिसांनी सांगितले , की याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे . त्या विभागाकडून खातरजमा झाल्यानंतर रक्कम संबंधितांना परत देण्यात येणार आहे . दरम्यान , ही रक्कम बिरादार यांचे मामा श्रीशैल्य पाटील यांच्या पशुखाद्याच्या व्यवसायातील असल्याचे बिरादार
यांनी सांगितले आहे . ही रक्कम सांगलीतील एका पशुखाद्य व्यापाऱ्याल देण्यासाठी बिरादारकडे देण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले .

No comments:

Post a Comment