Wednesday, April 1, 2020

खरेदी- विक्री दस्त नोंदणी 14 एप्रिलपर्यंत बंद

जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम 14 एप्रिल नंतर करण्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सांगली यानी दिले आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी आणखी पंधरा दिवस लोकांना वाट पाहावी लागणार आहे.

देशातील व राज्यातील वाढत्या कोरोना या विषाणू जन्य रोगाचे प्रादुर्भावामुळे देशभरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. अनेक विभाग बंद आहेत. त्यामुळे महसुल विभागांतर्गत नोंदणी खात्याने राज्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणी चे कामकाज दिनांक 31.मार्च अखेर पर्यंत थांबविण्याचे आदेश  या पूर्वी दिले होते. परंतु राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन सांगलीचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण  सांगली  डाॅ. श्री.  अभिजीत चौधरी यांनी जिल्हयातील दस्त नोंदणी चे कामकाज दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खरेदी-विक्री दस्त नोंदणी आता आणखी पंधरा दिवस लांबणीवर पडली आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून खरेदी-विक्री कामकाज ठप्प आहे. आता आणखी पंधरा दिवस यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment