Monday, April 13, 2020

बेळगाव जिल्ह्यात 17 कोरोनाबाधित रुग्ण

अथणी,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील मिरज,जत तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यात 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्याच्या सीमेवर असलेल्या विजयपूर(विजापूर) मध्ये सहा रुग्ण आढळून आल्याने जत तालुक्यातील सीमेवरील नागरिक सतर्क झाले आहेत. कर्नाटकातून येणारे मार्ग जतच्या सीमेवर बंद करण्यात आले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील कुडची (ता.रायाबाग) येथील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील संख्या 17 झाली आहे. हिरबागेवाडीतील 21 जणांना कवारंटाईन केले असून सर्वाधिक 10 रुग्ण आढळून आल्याने कुडचीतील प्रत्येकाच्या आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश बजावले आहेत.
कर्नाटक राज्यात नव्याने 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील तिघे कुडचीतील आहेत. कोरोना बाधितांशी संपर्क आल्याने त्यांच्या घशातील द्रव (स्वब) प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघेही पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे 20,14 आणि 45 असे आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात विलीनीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यामुळे कुडचीतील कोरोना बाधितांची संख्या दहा झाली आहे. तर जिल्ह्यातील संख्या 17 वर पोहोचली आहे. त्यात कुडचीतील दहा, हिरबागेवाडीतील पाच आणि कॅम्प व बेलगुंदीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
कुडची कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असताना तिथे आणखी तिघे कोरोना बाधित आढळले आहेत. दिल्लीतील मरकजमध्ये शहरातील चौघे सहभागी झाले होते. या चौघांकडून सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

No comments:

Post a Comment